Court esakal
नागपूर

नागपूर : विकास ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांवरील गुन्हे रद्द

नोटबंदीविरुद्ध केलेल्या प्रदर्शनाप्रकरणी काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि अन्य पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नोटबंदीविरुद्ध केलेल्या प्रदर्शनाप्रकरणी काँग्रेसचे (Congress) शहराध्यक्ष विकास ठाकरे (Vikas Thackeray) आणि अन्य पाच जणांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात आला आहे. केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटबंदी जाहीर केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शहर काँग्रेस कमिटीने या निर्णयाविरुद्ध आंदोलन केले. या प्रकरणी पंकज निघोट यांनी हे गुन्हे रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) नागपूर खंडपीठात अर्ज केला होता.

पोलिसांनुसार, या आंदोलनासाठी सदर पोलिसांनी परवानगी नकारली होती. तरीसुद्धा हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला काँग्रेसचे ४० ते ५० कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसांनी परवानगी नकारल्यावरही आंदोलन केल्याचा आरोपाखाली पोलिसांनी यातील सहा जणांवर गुन्हे दाखल केले. यात शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि पंकज ज्ञानेश्वर निघोट (३७, रा. गोपालनगर) यांचाही समावेश होता.

त्यांच्यावर भादंविच्या कलम १८८ आणि मुंबई पोलिस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला होते. सदर पोलिसांनी तपासाअंती आरोपपत्रही दाखल केले. अॅड. रजनिश व्यास यांनी आरोपीची बाजू मांली. हे अदखलपात्र गुन्हे आहेत. तसेच आंदोलनासाठी परवानगी नकारल्याचा कोणताही पुरावा पोलिसांनी सादर केलेला नाही.

याखेरीज आंदोलनात उपस्थित असलेल्या ४० ते ५० जणांच्या गर्दीतील केवळ सहाच जणांवर गुन्हा का दाखल करण्यात आला याचेही समाधानकारक स्पष्टीकरण देता आलेले नाही, असा युक्तिवाद बचावपक्षाकडून करण्यात आला. अतिरिक्त सरकारी वकील संजय डोईफोडेंनी सरकारची बाजू मांडली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावर न्यायालयाने सर्वच आरोपींवरील गुन्हे रद्द करण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forest Department Demolition : आजारी आई, पत्नीवर शस्त्रक्रिया अन् दिव्यांग मुलगा...; कोल्हापुरात वनविभागाच्या जेसीबीने तीन कुटुंबांचे संसार मोडले, असं घडलं काय?

NCAP Rating : नवीन फीचर्स, 25 kmpl मायलेज अन् 5 स्टार सेफ्टी; Maruti Brezza का ठरतेय बेस्ट SUV?

Latest Marathi News Live Update : CJP चे सौरव दास आणि अभिषेक रांका चर्चेत सहभागी; सरकारसोबतच्या बैठकीत तोडगा निघणार?

Mumbai Police: पोलिसाकडून महिला आंदोलकासोबत गैरवर्तन? विरोधकांचा आरोप, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांचे स्पष्टीकरण

Ratnagiri Farmer Loan Waiver : रत्नागिरीतील 7,333 शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती! पहिली यादी लवकरच प्रसिद्ध; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT