Nagpur News Esakal
नागपूर

Hemant Shukla Firing: शहरात बंदुकीसह फिरत होता हेमंत शुक्ला, प्रकार सीसीटीव्हीत कैद; बिष्णोई गँगसोबतही संबंध?

छायाचित्रकार विनय पुणेकर याचा खून करण्यापूर्वी आरोपी हेमंत शुक्ला सीताबर्डीसह संपूर्ण शहरात बंदुकीसह फिरल्याची धक्कादायक माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Vinay Punekar Murder Case: छायाचित्रकार विनय पुणेकर याचा खून करण्यापूर्वी आरोपी हेमंत शुक्ला सीताबर्डीसह संपूर्ण शहरात बंदुकीसह फिरल्याची धक्कादायक माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. त्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. दरम्यान या प्रकाराने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.

२३ फेब्रुवारीला सदर येथील विनय ऊर्फ बबलू सॅम्युअल पुणेकर याची गोळ्या झाडून हेमंत शुक्ला याने हत्या केल्याचे समोर आले. पोलिस तपासात दोन वेगवेगळ्या गोळ्या घालून खून झाल्याची बाब निदर्शनास आली. साक्षी ग्रोवरने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आदल्या दिवशी तो नागपुरात आल्याचे सांगण्यात आले.

मात्र, तो दोन दिवसांपूर्वीच आल्याची माहिती मिळाली आहे. वर्दळीचे ठिकाण असलेल्या सीताबर्डी हद्दीत तो दोन बॅगसह फिरताना सीसीटीव्ही कॅमेरात आढळला. तसेच इतरही ठिकाणी तो फिरल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, या बॅगमध्ये पिस्तुलही होते. घटनेच्या दिवशी साक्षी ग्रोवरनेच त्याला घर दाखविले होते. त्याला आपल्या फ्लॅटमध्ये थांबवले होते. (Latest Marathi News)

तपासात हेमंत शुक्ला हा कुख्यात गुंड असून त्याचा बिश्‍नोई गॅंगशी संबंध आहे काय? याबाबत तपास सुरू आहे. मात्र, असे असताना त्याचे हरयाणातील एका मोठ्या गॅंगशीही संबंध असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे हेमंत कुख्यात गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.

अद्यापही फरारच

विनयच्या खुनाला दहा दिवसांपेक्षा अधिकाचा कालावधी झाला आहे. मात्र, त्याचा खून करणाऱ्या हेमंत शुक्लाला ताब्यात घेण्यात अद्याप पोलिसांना अपयश आले आहे. सदर पोलिसांचे ‘लंबे हाथ’ अद्याप आरोपीपर्यंत पोहोचल्याचे दिसत नाही. त्यामुळे ‘हायटेक’ पोलिस हतबल झाले आहे.

(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT