Nagpur VNIT charges Five times increase in ten years sakal
नागपूर

नागपूर : ‘व्हीएनआयटी’ चे शुल्क दहा वर्षांत तिप्पट

सर्वसामान्य विद्यार्थ्यांना फटका; दहा वर्षाच पाचवेळा शुल्कवाढ

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रशिक्षण संस्थेने (व्हीएनआयटी) गेल्या दहा वर्षात आपल्या विविध अभ्यासक्रमांच्या शुल्कात तिपटीने वाढ केल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली. आहे. ‘व्हीएनआयटी’ने १० वर्षांत एकूण ५ वेळा शुल्क वाढवण्यात आले आहे. अधिवक्ता संगीता थूल यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकारात संस्थेने ही माहिती दिली आहे. केंद्रीय शिक्षण विभागांनी वेळोवेळी दिलेल्या पत्रांच्या आधारे ही शुल्क वाढ करण्यात आल्याचा संस्थेचा दावा आहे. संस्थेत सध्या ४८८२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. करोना काळात अनेक संस्थांनी शुल्कामध्ये वाढ थांबवली. करोना काळात लोकांचे रोजगार बुडाल्याने काही संस्थांनी शुल्क माफीही दिली आहे. मात्र, व्हीएनआयटीमध्ये दहा वर्षांत तिपटीने शुल्क वाढ झाली आहे.

अशी आहे शुल्कवाढ

बी.टेक.

  • २०१२-१३ मध्ये बी. टेक. अभ्यासक्रमाचे शुल्क ४१ हजार ८५० होते.

  • २०१४-१५ मध्ये हे शुल्क ५० हजार १०० रुपये झाले.

  • २०१५-१६ च्या सत्रात हे शुल्क ९३ हजार ७०० रुपये झाले.

  • २०१७-१८ च्या सत्रात शुल्क पुन्हा १ लाख ४८ हजार ७०० रुपये करण्यात आले.

  • २०२०-२१ मध्ये शुल्क वाढून १ लाख ४९ हजार २०० रुपये झाले.

बी.आर्किटेक्चर

  • २०१२-१३ मध्ये बी.आर्क. अभ्यासक्रमाचे शुल्क ४१ हजार ९३०रुपये होते. शैक्षणिक सत्र २०१४-१५ मध्ये हे शुल्क ५१ हजार ४०० रुपये झाले.

  • २०१५-१६ मध्ये ९५ हजार रुपये.

  • २०१७-१८ मध्ये पुन्हा १ लाख ५० हजार रुपये शुल्क वाढवण्यात आले.

  • २०२०-२१ मध्ये शुल्क वाढून १ लाख ५० हजार ५०० रुपये झाले.

एम.टेक.

  • २०१२-१३ मध्ये एम.टेक. चे शुल्क ४३ हजार ८५० रुपये होते. २०१४ मध्ये ते ४९ हजार ५०० रुपये झाले.

  • २०१५ मध्ये हे शुल्क ९३ हजार १०० रुपये झाले.

  • २०२० मध्ये हे शुल्क वाढवून ९३ हजार ६०० रुपये करण्यात आले.

एम.एसस्सी.

  • २०१२ मध्ये या अभ्यासक्रमाचे शुल्क १५४५० रुपये होते. २०१४ मध्ये ते २१५०० रुपये झाले.

  • २०१५ मध्ये ३५१०० रुपये

  • २०१९ मध्ये ३६६०० रुपये करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT