Nagpur water supply planning with 10 percent of available water reserved for emergency drinking water needs.

 

esakal

नागपूर

Water Conservation Measures: नागपूरकरांनो पाणी जपून वापरा;पाणीपुरवठ्यावर कपातीचे सावट; जलाशयांत निम्माच जलसाठा

Nagpur Water Supply, 10% Emergency Water Reserve, Water Conservation : राज्य शासनाच्या नव्या पाणीवाटप निर्देशांनुसार उपलब्ध पाण्यापैकी १० टक्के साठा आपत्कालीन पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवला जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर,:सध्या शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेकडून दररोज ७५० एमएलडी पाण्याची उचल केली जाते. शासनाच्या १० टक्के साठा आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वतंत्र राखीव ठेवण्याच्या निर्देशानंतर ही उचल सुमारे ६७५ एमएलडीपर्यंत घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूरकरांनाही पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.

कमी पाऊस आणि एल-निनोच्या प्रभावामुळे राज्यातील जलसाठ्यावर निर्माण झालेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पाणीवाटपासाठी काटेकोर प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. त्यानुसार पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, उपलब्ध पाण्यापैकी १० टक्के साठा आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वतंत्र राखीव ठेवला जाणार आहे. हे निर्देश १६ ऑक्टोबरपासून लागू होणार असून ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत लागू राहणार आहेत. नागपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांमधून पिण्याच्या पाण्याची गरज प्रथम निश्चित केली जाणार आहे. आजघडीला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत निम्माच जलसाठा उपलब्ध आहे.

नागपूरसाठी ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत २५९ दशलक्ष घनमीटर (एमसीएम) पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यानंतर बाष्पीभवनामुळे होणारे अपरिहार्य नुकसान तसेच गाळ साचल्याने घटणारी प्रत्यक्ष साठवण क्षमता विचारात घेऊन उपलब्ध पाण्याचे गणित मांडले जाणार आहे. पिण्याच्या पाण्याची गरज आणि अपरिहार्य नुकसान वजा केल्यानंतर उपलब्ध पाण्यापैकी १० टक्के साठा केवळ आपत्कालीन पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात येईल.

नियोजनासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जि. प. चे सीईओ आदी अधिकारी समितीत असतील. ही समिती प्राधान्यक्रमानुसार पाणीवापर आराखड्यांना मंजुरी देईल.

पाणीवाटपाचा प्राधान्यक्रम

  • १० टक्के - स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पाणीकपात

  • प्रथम प्राधान्य - पिण्याचे पाणी

  • १० टक्के - आपत्कालीन पिण्याच्या पाण्यासाठी राखीव

  • ३० टक्के - उद्योगांना पाण्याच्या पुनर्वापराचे उद्दिष्ट

  • शेतीत प्राधान्य - बीजोत्पादन, चारा, रब्बी सिंचन, हंगामी व बारमाही पिके

  • धरणांची स्थिती (दलघमी)

धरण सध्याचा साठा मागील वर्षीचा साठा

  • तोतलाडोह ५०.५२ टक्के ९९.९२ टक्के

  • कामठी खैरी ७८.१६ टक्के ९७.१९ टक्के

  • वडगाव ५९.३८ टक्के १००.०० टक्के

  • खिंडसी ६७.५५ टक्के १००.०० टक्के

  • नांद ८५.१८ टक्के १००.०० टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टीम इंडियाचे 'Fantastic Four'! आयसीसीची मोठी घोषणा, जगात भारताच्या ८ खेळाडूंचा डंका

Sant Balumama Temple Land Scam : आदमापुरातील संत बाळूमामा ट्रस्ट जमीन गैरव्यवहारात अतिग्रेच्या माजी सरपंचाला अटक; सात दिवसांची पोलिस कोठडी

अनेकांनी पैसे बुडवले, पत्नीमुळे तरला! 'हे' काम करते 'दृश्यम ३'मधल्या गायतोंडेची बायको; दिसायलाही आहे इतकी सुंदर

Latest Marathi News Live Update : विरोधी पक्षनेते राहुल गांधी विरोधी पक्षाच्या खासदारांसोबतच्या स्नेहभोजनास उपस्थित

Bharadi Death News: भराडीत दारूच्या दुकानासमोर तरुणाचा मृतदेह; शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

SCROLL FOR NEXT