Nagpur wife Murder case husband killed her wife by knife esakal
नागपूर

नागपूर : गळा चिरून पत्नीचा खून

जुनी मंगळवारीतील थरार; पाच दिवसांनी होते मुलाचे लग्न

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जुनी मंगळवारी ढिवरपुरा येथे मुलाच्या लग्नाच्या कार्यक्रमासाठी घरी उपस्थित राहा हे सांगण्यासाठी गेलेल्या पत्नीचा गळ्यावर, पोटावर आणि चाकूने वार करत पतीनेच खून केला. ही घटना शनिवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली.

छाया रामदास बोरीकर (वय ५२, रा. जुनी मंगळवारी ) असे मृत पत्नीचे नाव असून रामदास बोरीकर (वय ६० रा. धीवरपुरा) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातून छाया आणि रामदास हे २०१७ साली वेगवेगळे झाले होते. त्यांना सतीश आणि राकेश अशी दोन मुले आहेत. दोघेही आईसोबत वास्तव्यास राहत होते. रामदास हा वेळोवेळी छायाशी वाद घालायचा. अनेकदा त्याने भांडणही केले होते. ९ जूनला छायाचा मोठा मुलगा असलेला सतीश बोरीकर (वय ३२) याचे लग्न होते.

त्याच्या लग्नात पित्याने घरच्या सर्व कार्यक्रमात उपस्थित राहावे अशी कुटुंबातील सदस्यांची इच्छा होती. त्यामुळे रविवारपासून लग्नाच्या कार्यक्रमास सुरवात होत असल्याने त्यात उपस्थित राहावे हे सांगण्यासाठी शनिवारी सकाळी छाया बोरीकर परिसरात असलेल्या रामदासच्या घरी सकाळी साडेसहा वाजता गेल्या. यावेळी त्यांनी लग्न कार्यात सहभागी होण्यासाठी पतीला गळ घातली.

मात्र, यावर चिडून रामदासने छायाशी वाद घालण्यास सुरवात केली. वाद विकोपाला गेल्याने रामदासने रागाच्या भरात चाकूने छायाच्या गळ्यावर सपासप वार केले. ही घटना आजुबाजुच्यांना कळताच, त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी रामदासला अटक केली व गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: महाराष्ट्रावर ११ लाख कोटींचं कर्ज.. इराणबद्दल भूमिका अन् इन्स्टाग्राम रील्स; गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं मुद्द्यांवर बोट

Vehicle Green Tax: महाराष्ट्रात वाहनधारकांना मोठा धक्का! वाहनांवर ग्रीन टॅक्स वाढणार; नवीन कर रचना किती? जाणून घ्या...

Akola Unseasonal Rain : अकोल्यात अवकाळी पावसासह गारपीट; पिकांना फटका

Nanded News : अर्धापूरात गारपीट व वादळी वाऱ्याचा तडाखा; केळी, टरबूज, गहू, आंबा पिकांचे मोठे नुकसान

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचा रोख कुणाकडे? ''राज्यातील बड्या नेत्यांचं मला संपवायचं कारस्थान...''

SCROLL FOR NEXT