corona 
नागपूर

हे शहर होणार मध्यभारतातील महत्त्वाचे कोरोना चाचणी केंद्र

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : सध्या कोरोना हा एकमेव चर्चेचा व चिंतेचा विषय आहे. सामान्य नागरिकांपासून तर शासन-प्रशासन; पोलिस; डाँक्टर्स असे सगळेच या भीषण आरोग्य आणीबाणीच्या निवारणासाठी प्रयत्नशील आहेत. त्यातील महत्त्वाची पायरी म्हणजे कोरोनाची चाचणी. त्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत.                          कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी सर्वच घटक प्रयत्न करीत असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्येही ‘कोरोना चाचणी केंद्र’ तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे उपराजधानीमध्ये पाच कोरोना चाचणी केंद्र सुरू होणार असून मध्य भारतातील विविध भागांतील कोरोना चाचण्या येथे होण्याची शक्यता आहे.
                   राज्यात अकृषक विद्यापीठांमध्ये नांदेड येथील रामानंद तीर्थ विद्यापीठाला कोरोना चाचणी केंद्रासाठी पहिल्यांदा मान्यता मिळाली. त्यानंतर नागपूर विद्यापीठानेही पुढाकार घेत चाचणी केंद्रासाठी प्रस्ताव पाठविला होता. ‘कोरोना’ चाचणी प्रक्रियेला गती मिळावी यासाठी विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’मध्ये ‘कोरोना’ चाचणी सुविधा केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, असे प्रस्तावात नमूद होते. यावर ‘आयसीएमआर’या पथकाकडून नुकतेच विद्यापीठातील प्रयोगशाळेचे निरीक्षण करण्यात आले. यावेळी औषधनिर्माण शास्त्र, सुक्ष्मजीवशास्त्र आणि जीव रसायनशास्त्र या विभागात तयार करण्यात आलेल्या प्रयोगशाळेचे निरीक्षण करण्यात आले. यानंतर ‘आयसीएमआर’ पथकाने अहवालही तयार केला आहे.

कोरोना चाचणी केंद्रांची संख्या पाच होणार                                      विद्यापीठाच्या तयारीवर पथक समाधानी असल्याने लवकरच नागपूर विद्यापीठामध्ये कोरोना चाचणी केंद्र सुरू होण्याची चिन्हे आहेत. सध्या नागपूरात इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, एम्स आणि पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, अशा चार ठिकाणी कोरोना चाचणी केंद्र सुरू आहेत. या चारही केंद्रामध्ये विदर्भातून तपासणीसाठी नमूने येत आहेत. त्यात नागपूर विद्यापीठाच्या केंद्राची भर पडल्यास कोरोना चाचणी केंद्रांची संख्या पाच होणार असून मध्य भारतात नागपूर हे कोरोना चाचणीचे मोठे केंद्र होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul dairy election politics : पुढच्या ३ महिन्यात गोकुळ दूध संघासाठी होणार मतदान, लवकरच वातावरण तापणार

प्राइम व्हिडिओ भारतीय प्रेक्षकांसाठी नव्या वेबसिरीज आणि सिनेमे ; जाहीर केली अधिकृत यादी

Latest Marathi News Live Update : मंत्री नरहरी झिरवाळ व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण

Small Savings Update: बँक FD पेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिस स्कीम्सवर मोठा अपडेट; आता किती व्याज मिळणार?

Chhatrapati Sambhajinagar: तलाठ्यांना चिरडण्याचा प्रयत्न; पंचनामा करताना प्रकार; सिल्लोडमध्ये वाळू माफियांची वाढली मुजोरी

SCROLL FOR NEXT