नागपूर : आजही एड्स, क्षयरोग आणि मलेरियाने होणाऱ्या मृत्यूपेक्षा विकसनशील देशात प्रदूषणामुळे जास्त मृत्यू होतात. बऱ्याच अंशी मेंदूरोगांव्यतिरिक्त, फुफ्फुस, हृदयविकार तसेच कॅन्सरच्या आजारांमध्ये वायू प्रदूषण कारणीभूत ठरत आहे. देशात दरवर्षी वायू प्रदूषणामुळे १८ लाख लोक मृत्यूमुखी पडत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणातून पुढे आले आहे. तब्बल २७ टक्के मृत्यू प्रदूषणामुळे होत आहेत.
जगभरात ५ जून या जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधून इंडियन ॲकॅडमी ऑफ न्युरोलॉजीच्यावतीने रविवारी चर्चासत्राचे आयोजन केले आहे. ‘पर्यावरण आणि मेंदू’ या विषयवार होणाऱ्या सार्वजनिक शिक्षण आणि जागरूकता कार्यक्रमासंदर्भात तज्ज्ञांशी साधलेल्या संवादातून औद्योगिक क्रांतीनंतर मानवनिर्मित प्रक्रियेमुळे पर्यावरणाच्या होणाऱ्या नुकसानाकडे साफ दुर्लक्ष केले जाते. आपण जे अन्न, पाणी ग्रहण करतो आणि श्वास घेतो ते वातावरण म्हणजे निसर्ग आहे. यामुळेच निसर्गाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. पर्यावरण हे मेंदूचा विकास, मेंदूचे कार्य आणि मेंदूच्या स्वास्थाशी जुळलेले आहे.
शिसेमुक्त इंधनाचा वापर व्हावा
शिसेमुक्त इंधनाच्या वापरनतंर अमेरिकेतील मुलांच्या बुद्ध्यांकामध्ये ३ ते ५ टक्क्याने वाढ झाली असे संशोधनात दिसून आल्याची माहिती तज्ज्ञांच्या निरीक्षणात नोंदविली आहे. वृक्ष, हिरवळ आणि बागा यांचा आपल्या एकूण आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
कोरोना विषाणू झुनोटिक असतात. भविष्यातील उद्रेक रोखण्यासाठी आपण पर्यावरण, वन्यजीव यांच्याकडे लक्ष द्यावे. अलीकडे जगभरात ९० लाख लोक प्रदूषित हवेमुळे दरवर्षी मृत्यू पावतात. भारतातील वायू प्रदूषणामुळे दरवर्षी १८ लाख लोकांचा मृत्यू होतो.
-डॉ. चंद्रशेखर मेश्राम, प्रसिद्ध मेंदू रोगतज्ज्ञ
आंतरराष्ट्रीय संघाने १८८ देशांच्या आकडेवारीचा वापर करीत ग्लोबल बर्डन ऑफ डिसिजचा अभ्यास केला. यात जगातील ३० टक्के लोकांना हवेतील प्रदूषकांमुळे पक्षाघात होतो असे आढळले आहे.
-डॉ सेरिफनूर ओझंतुर्क, उपाध्यक्ष
स्ट्रोक, ऑटिझम आणि मुलांमध्ये स्मृतीदोष आणि प्रौढांमध्ये स्मृतिभ्रंश आणि पार्किन्सनसाठी वायू प्रदूषण कारणीभूत ठरू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या निष्कर्षानुसार जगातील ९९ टक्के लोक दूषित हवेत श्वास घेत आहेत.
-डॉ मुस्तफा, मोरोको
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.