Nagpur Crime Esakal
नागपूर

Yavatmal Crime: नवीन कुलर न दाखविल्याने वृद्धाचा खून, दहीफळ येथील घटना; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

घरी नवीन आणलेला कुलर पाहण्यासाठी शेजारी घरी आला. मात्र, घरी पाहुणे असल्याने नंतर ये, असे म्हणत बाहेर काढले. यामुळे आलेल्या रागातून कुर्‍हाडीने वृद्धावर वार करण्यात आला.

सकाळ डिजिटल टीम

Yavatmal Murder Due to Cooler: घरी नवीन आणलेला कुलर पाहण्यासाठी शेजारी घरी आला. मात्र, घरी पाहुणे असल्याने नंतर ये, असे म्हणत बाहेर काढले. यामुळे आलेल्या रागातून कुर्‍हाडीने वृद्धावर वार करण्यात आला. ही घटना बुधवारी (ता.१३) दुपारी तीन वाजता दारव्हा तालुक्यातील लाडखेड पोलिस ठाण्याअंतर्गत येणार्‍या दहीफळ येथे घडली. या घटनेतील जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्रकाश उद्धव इंदाने (वय ६०, रा. दहीफळ) असे मृताचे नाव आहे. इंदाने यांनी बुधवारी घरी नवीन कुलर विकत आणला. त्याचवेळी तो कुलर पाहण्यासाठी सचिन अंबादास कोसरे (वय ३५, रा. दहीफळ) हा इंदाने यांच्या घरी आला. इंदाने यांच्या घरी पाहुणे असल्याने त्यांनी कुलर पाहण्यास तू सध्याकाळी किंवा नंतर येसीन, असे सांगितले. यानंतर सचिन शिवीगाळ करून तेथून निघून गेला.

काही वेळात सचिन कुर्‍हाड घेऊन आला आणि त्याने प्रकाश इंदाने यांच्या डोक्यावर कुर्‍हाड मारून त्यांना गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत इंदाने यांना वर्धा येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. डोक्याला गंभीर मार लागल्याने आणि रक्तस्त्राव जास्त झाल्याने इंदाने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Latest Marathi News )

या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाडखेड पोलिसांनी आरोपीस अटक केली. पुढील तपास लाडखेड ठाणेदार विशाल हिवरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरिक्षक विनोद मातरे, मयूर तेल्लेवार, उमेश शर्मा, विठ्ठल कोपणार करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: कर्जाच्या डोंगरामुळे तरुण शेतकऱ्याने दिला जीव

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT