nagpur youth accident 
नागपूर

खाणीत पकडत होता मासे अचानक जाळ्यात अडकला पाय... मग

सकाळवृत्तसेवा

नागपूर : मासे पकडण्याचा मोह एका युवकाच्या जिवावर बेतला. मासे पकडत असताना पाण्यातील जाळ्यात पाय अडकल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कोराडीत उघडकीस आली. संदीप गौतम घोळगे (22, रा. सुरादेवी) असे मृताचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 2 यादरम्यान संदीप हा सुरादेवी गावाजवळील खाणीतील मासे पकडण्याकरिता मित्रांसह गेला होता. पाण्यात आधीच कुणीतरी जाळे टाकून ठेवले होते. संदीप पाण्यात उतरला. त्याला जाळे दिसले नाही. मासे पकडण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचा पाय जाळ्यात अडकला. त्याला पाय जाळ्यातून बाहेर काढता आले नाही. त्यामुळे तो पाण्यात बुडाला. गौतम गुणाजी घोळगे (52) यांच्या सूचनेवरून कोराडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 

मित्रांसमोरच गेला जीव 
संदीप दोन मित्रांसह मासे पकडण्यासाठी गेला होता. संदीप पाण्यात उतरला, तर दोन्ही मित्र बाहेर उभे होते. अचानक संदीप बुडायला लागल्याने मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र, कुणीही धावून आले नाही. पोहणे येत नसल्यामुळे मित्र पाण्यात उतरले नाही. त्यामुळे संदीपचा जीव गेला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT