maramari sakal
नागपूर

Nagpur : वाहन ठेवण्यावरून वाद, युवकाचा खून

दोघे जखमी यशोधरानगरमधील घटना

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : घरसमोर मॅक्सी वाहन ठेवण्याच्या कारणाहून दोन गटात झालेल्या वादातून झालेल्या हाणामारीत १८ वर्षीय युवकाचा खून झाला. याप्रकरणी तिघे जखमी असून त्यांच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना यशोधरानगरात गुरुवारी (ता.१९) रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास घडली.

योगेश धामने (वय १८ रा. इंदिरा गांधीनगर) असे मृतक युवकाचे नाव असून तो पेंटिंगचे काम करतो. रामभाऊ शाहू (रा. विनोबा भावेनगर) असे जखमीचे नाव आहे. मोनू बन्सीलाल रायतदार (वय २२), सुदामा बन्सीलाल रायतदार वय (वय २४) आणि नंदलाल रायतदार (सर्व रा. विनोबा भावेनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी रामभाऊ शाहू आणि योगेश धामने यांच्या मोनू रायतदार, सुदामा आणि त्यांचा काका नंदनलाल रायतदार यांच्यात घरासमोर मॅक्सी वाहन ठेवण्यावरून वाद झाला होता. झालेल्या भांडणात त्यांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. दरम्यान गुरुवारी रात्री जेवण झाल्यावर योगेश रामभाऊ शाहू यांच्या घरी आला.

ते दोघेही बाहेर उभे असताना, मोनू आणि योगेशमध्ये पुन्हा वाद झाला. त्यातून रामभाऊ यांनी मोनूला मारहाण सुरु केली. त्यामुळे घरातून नंदलाल आणि सुदामा आल्याने त्यांनी चाकू, दंडा आणि लोखंडी रॉडने योगेशला मागण्यास सुरुवात केली.

यात योगेशचा जागीच मृत्यू झाला. रामभाऊ शाहू आणि मोनू गंभीर जखमी झाल्याने त्यांना मेडिकलमध्ये दाखल केले. विशेष म्हणजे रामभाऊ शाहू याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT