Nagpur Zilla Parishad 
नागपूर

नागपूर जिल्हा परिषदेतही बंडखोरी?

माजी मंत्री सुनील केदारांनी केली सदस्यांसोबत वन टू वन चर्चा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यात बंडखोरी झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष अलर्ट झाले आहे. कॉंग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार यांनी आज जिल्हा परिषदेतील सर्व सदस्यांसोबत वन टू वन चर्चा करून सर्कलमध्ये (मतदार संघात) केलेल्या कामासोबतच अडचणीबाबत माहिती घेतली. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होत असून यात संभाव्य होणाऱ्या बंडखोरीबाबतही कानोसा घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

जिल्हा परिषदेत कॉंग्रेसची सत्ता असून माजी मंत्री सुनील केदार गटाचे वर्चस्व आहे. येत्या काही दिवसात अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. या दोन्ही पदासाठी कॉंग्रेसमधील काही सदस्य आग्रही आहे. नाना कंभाले यांनी तर उघडपणे अध्यक्ष पदाचे दावेदार असल्याचे स्पष्ट केले आहे. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांच्याकडून अर्ज करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. अरूण हटवार हे उपाध्यक्ष पदासाठी आग्रही आहेत. राज्यात सत्तांतर झाल्याने विरोधकांचे मनोबल वाढले असून त्यांच्या गळाला लागणाऱ्यांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

राज्यासोबत जिल्हा परिषदेत सत्तांतर करण्याचा प्रयत्न त्यांच्या आहे. त्यामुळे कॉंग्रेसमधील बंडखोरांवर त्यांची नजर आहे. सदस्यांमध्ये काहीशी नाराजी असल्याचे सांगण्यत येते. त्यामुळेच आज माजी मंत्री सुनील केदार यांनी सर्व सदस्यांना बोलावून घेत त्यांच्याकडून कामाचा आढावा घेतला. या बैठकीला सर्व सदस्य उपस्थित असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. सर्व सदस्यांसोबत वन टू वन माहिती घेतली. त्यांच्या सर्कलमध्ये झालेली कामे, निधीचा त्रास, येत असलेल्या अडचणीची इत्यंभुत माहिती घेतल्याचे समजते.

अध्यक्ष व उपाध्यक्षसह सभापतींच्या कामाबाबतही त्यांनी माहिती जाणून घेतल्याचे सांगण्यात येते. काही पदाधिकाऱ्यांच्या कामाबाबत सदस्यांकडून नाराजी व्यक्त केल्याचेही समजते. जिल्हा परिषदेत संभाव्य बंडखोरीचाही त्यांनी आढावा घेतल्याचे समजते. कारभारावर काही प्रमाणात समाधान व्यक्त करीत नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

सत्तापक्ष नेत्यांकडून व्हीप

उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने पुढील आढवड्यात बैठक होणार असून या बैठकीत सर्व सदस्यांनी उपस्थित राहण्याचा व्हीप सत्तापक्ष नेत्या अवंतिका लेकुरवाळे यांनी काढल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

उज्ज्वला बोढारेंची उपस्थिती

केदार यांनी कॉंग्रेस सदस्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला राष्ट्रवादी कॉंग्रेस सदस्या तथा महिला व बाल कल्याण सभापती उज्ज्वला बोढारे याही उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितवरून आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून ते कॉंग्रेसमध्ये जाणार तर नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT