Nagpur Zilla Parishad  sakal
नागपूर

Nagpur : चर्चा न करताच विषय मंजूर; बंडखोरही आक्रमक

संतप्त विरोधकांची सभागृहात तोडफोड

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्हा परिषदेच्या सभेत पत्रिकेवरील विषयांवर चर्चा न करताच अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी ते मंजूर करीत सभा गुंडळाल्याने संतप्त विरोधकांनी सभागृहातील साहित्याची फेकफोक करीत तोडफोड केली. सत्ताक्षातील बंडखोरांनाही विरोधकांना साथ दिली. यामुळे शेवटच्या टप्प्यात वातावरण चांगलेच तापले होते.

६ महिन्यानंतर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली. पहिल्याच सभेत नवीन पदाधिकाऱ्यांची चांगलीच कसोटी लागली. सत्ताधारी पक्षात माजी अध्यक्षा रश्मी बर्व, प्रकाश खापरे, दुधाराम सव्वालाखे, तापेश्वर वैद्य, सलील देशमुख, उज्ज्वला बोढारे पदाधिकाऱ्यांच्या बचावाला धावून आले. त्यातही बर्वे विरोधकांवर हल्ला करण्यात अग्रेसर होत्या. विरोधकांनही चांगलीच आक्रमक भूमिका घेतली.

शिंदे- फडणवीस सरकारचे नाव येताच विरोधी पक्ष नेते आतिश उमरे व संजय झाडे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. सभेत अनेक सदस्यांनी मुद्दे मांडले. शेवटी विषय पत्रिकेला हात घालण्यात आला. अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी सर्व १ ते १० विषय मंजूर केल्याचे जाहीर केले. त्याच वेळेस आतिश उमरे, संजय झाडे व इतरांनी विषयांवर चर्चा करण्याची मागणी केली. परंतु अध्यक्षा कोकड्डे यांनी सभा गुंडळली. त्यामुळे संतप्त विरोधकांनी सभागृहातील टेबल, खुर्च्यांची तोडफोड केली. माइकही फेकले. कागदपत्रही भिरकावले.

कॉंग्रेसचे बंडखोर सदस्य नाना कंभाले यांनीही विरोधकांना साथ दिली. विषय पत्रिकेवरील विषयांना विरोध असून त्याची नोंद करण्याची मागणी सदस्यांना प्रशासनाकडे केली. दोन्ही पक्षांतील सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. सर्वसाधारण सभेत कामांना स्थगिती दिल्याचा मुद्दा चांगलाच गाजला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cockroach Janata Party : कॉक्रोच जनता पार्टीचे सोशल मीडिया अकाउंट्स हॅक; डिजिटल हल्ल्याने खळबळ, समर्थक आक्रमक!

Green Card Rules Changes : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा भारतीयांना मोठा धक्का; ग्रीन कार्डसाठीचे नियम बदलले, आता मायदेशी परतावं लागणार...

Marathi Live News update: अकरावी प्रवेश प्रक्रियेचा फज्जा, दुसऱ्या दिवशीही गोंधळ

Konkan Heritage: कोदवली येथे तीन मराठाकालीन शिलालेख; फेब्रुवारी १८४५ मध्ये झाला श्री शंकरेश्वराचा जीर्णोद्धार, बंदर प्रशासनाचा इतिहास

Beed Encroachment: कचऱ्यात फेकली आजीची भाजी; अतिक्रमणविरोधी कारवाई, बीडमध्ये भाजीविक्रेत्या वृद्धेला अश्रू अनावर..

SCROLL FOR NEXT