nagpur zp president instructions for immediate appointment of a doctor in Kalmeshwar  
नागपूर

आरोग्य अधिकाऱ्यांनीच अध्यक्षांना दिली चुकीची माहिती! कळमेश्वरमध्ये डॉक्टरच्या तत्काळ नियुक्तीचे निर्देश

नीलेश डोये

नागपूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत कोरोनाचा मुद्दा गाजला. ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सुरळीत नसल्याच्या कारणावरून आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. यातच समितीला खोटी माहिती देण्याचा प्रकार समोर आल्याने अध्यक्षांनी संतप्त व्यक्त केला. 

जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या अध्यक्षतेत आरोग्य समितीची बैठक पार पडली. कोरोनाबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सेलोकर यांनी दिली. जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या रुग्णालयांबाबत ही त्यांनी माहिती दिली. कळमेश्वरमधील रुग्णालय बंद असतानाही ८० खाटांचे कोरोना रुग्णालय कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. ही माहिती खोटी असल्याचे लक्षात येतात त्यांना धारेवर धरण्यात आले. पदाधिकारी, अधिकाऱ्यांचे फोन उचलत नसल्याच्या मुद्यावरूनही त्यांना चांगलेच खडेबोल सुनावण्यात आले. बैठकीत त्यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तर दिल्याने अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी सेलोकर यांना आपल्या कक्षात बोलावून घेतले. कळमेश्वरमधील रुग्णालयात तत्काळ कंत्राटी डॉक्टरची नियुक्ती करण्याचे निर्देश दिल्याचे बर्वे यांनी सांगितले. 

हेही वाचा - मोबाईलने घेतलीय चाईल्ड बुकची जागा, शिशू गटासाठी...
 
कंत्राटी डॉक्टरांना तत्काळ रुजू करण्याचे आदेश देण्यात आले. ११ महिन्याच्या कंत्राटावर त्यांची नियुक्ती असते. काही जण दोन, चार महिन्यातच सोडून जातात. त्यामुळे त्यांच्याकडून ११ महिने काम करण्याचे हमीपत्र लिहून घेण्यात येईल. 
-रश्मी बर्वे, अध्यक्ष. जि.प. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंधन तेलाच्या दराचा भडका उडणार, USचा खार्ग बेटावर हल्ला; ९० टक्के कच्च्या तेलाची इथूनच होते निर्यात

IT Park Kolhapur : कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी जमीन हस्तांतरणाचा आदेश, महानगरपालिकेची परवानगी घ्यावीच लागणार

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

एका दिवसाच्या सोबतीसाठी वाट्टेल ते! साई पल्लवीचा अमिर खानच्या लेकासोबत रोमान्स, अनोखी प्रेमकहाणी चर्चेत

Paithan News: नाथषष्ठी यात्रेत पैठणची बाजारपेठ फुलली; तीन दिवसांत २५ कोटींची उलाढाल; संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी यात्रेत भाविकांची गर्दी,

SCROLL FOR NEXT