nagpur zp president refused to give fund for department 
नागपूर

निधीसाठी पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी; अध्यक्ष, उपाध्यक्षांचा निधी देण्यास तूर्त नकार

नीलेश डोये

नागपूर : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये निधीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी उडाली. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी हा विषय समितीत घेण्यासारखा नसल्याचे सांगत तूर्त निधी देण्यास नकार दिला. 

आर्थिक वर्ष संपत आले असताना अद्याप कोणत्याही विभागाला समितीला निधी मिळाला नाही. त्यामुळे वैयक्तिक लाभासह इतरही अनेक योजना रखडल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या तिजोरीत ५ कोटींच्या घरात रक्कम आहे. योजना राबविण्यासाठी काही रक्कम शिक्षण समितीला देण्याचा ठराव सभापती भारती पाटील यांनी ठेवला. त्यांच्या प्रस्तावाला पशुसंवर्धन समिती सभापती तापेश्वर वैद्य यांनी समर्थन दिले. निधी अपुरा असून प्रशासकीय कामासाठी लागणार असल्याने असलेल्या निधीतून कोणत्याही समितीला निधी देता येणार नसल्याचे वित्त अधिकार प्रिया तेलकुंठे यांनी स्पष्ट केले. समाजकल्याण समिती सभापती नेमावली माटे व महिला व बालकल्याण समिती सभापती उज्ज्वला बोढारे याही निधी मिळण्याच्या पक्षात होत्या. अध्यक्ष रश्मी बर्वे व उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी प्रशासनाची बाजू घेतली. निधीचा विषय अंतर्गत आहे. बैठकीत विषय न घेता नंतर चर्चा करण्याचे धोरण अवलंबित शिक्षण समितीचा प्रस्ताव नाकारला. विरोधी पक्ष नेते अनिल निधान यांनीही भारती पाटील यांची बाजू उचलून धरत निधी देण्याची मागणी केली. 

सत्ताधारी सदस्यच नाराज 
कामावरून सत्ताधारी सदस्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. बैठकीत उपस्थित केलेले मुद्दे मार्गी लागत नसेल तर यायचे कशाला, असा प्रश्नच अवंतिका लेकुरवाळे आणि दिनशेचंद्र बंग यांनी उपस्थित केलेल्याची माहिती आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Today: सोन्याच्या भावात 5 दिवसांत मोठी घसरण! उच्चांकापासून तब्बल 33 हजारांनी स्वस्त; दसऱ्याआधी पाहा ताजा भाव

Distance Education: राज्यात दूरस्थ शिक्षण घेणारे वाढले ;केंद्रीय उच्चशिक्षण विभागाचा अहवाल

Train Viral Video : वा रे पठ्ठ्या ! थेट ट्रेनच्या एसी डब्यातच थाटले पानाचे दुकान, अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

स्मृती मानधनाचा कर्णधार म्हणून आज पहिला सामना! दुसरीकडे भारताच्या स्टार महिला क्रिकेटपटूची अचानक निवृत्ती...

Marathi News Live Updates: तिरंगा फडकवण्याच्या आवाहनानंतर दिल्लीतील टॉलस्टॉय मार्ग परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

SCROLL FOR NEXT