नागपूर : हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये दोन गटांत 'राडा’; तरुणीचा विनयभंग sakal
नागपूर

नागपूर : हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये दोन गटांत 'राडा’; तरुणीचा विनयभंग

अनिल कांबळे : सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जनता चौकाजवळील हॉटेल सेंटर पॉईंट येथे आयोजित वाढदिवसाच्या पार्टीत दोन गटात राडा होऊन एका तरुणीचा विनयभंग करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या गटातील युवकांनी एकाला काचेच्या बाटलीने मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सौरभ घोडे नावाच्या युवकाचा वाढदिवस होता. त्यामुळे त्याने हॉटेल सेंटर पाँईट येथे पार्टीचे आयोजन करून मित्र आणि मैत्रिणींना आमंत्रित केले होते. याच हॉटेलमध्ये सौरभ सुहास कुळकर्णी (३२) सद्भवनानगर, राहुल निखाडे (जटपुरा, चंद्रपूर) आणि यश राजकुमार शर्मा (२५) मनिषनगर हे जेवण करण्यासाठी आले होते. रात्र झाल्याने तिघांनीही हॉटेलमध्येच खोली बूक करून ते तेथे झोपी गेले.

सकाळी ४.३० वाजेपर्यंत पार्टी सुरू होती. पार्टी रंगात आली असताना यश शर्मा आपल्या साथीदारांसह हॉलमध्ये सुरू असलेल्या पार्टीत गेला. सोफ्यावर पाय ठेवून यश बसला. पीडित २२ वर्षीय तरुणीचा मित्र साहील याने यशला सोफ्यावरून पाय काढण्यास सांगितले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादावादीनंतर यश व त्याचे मित्र हॉलमधून बाहेर निघाले. त्यांच्या मागोमाग साहील देखील आला असता यशने साहीलला शिवीगाळ करीत मारहाण केली. तरुणीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तिच्या अंगाला हात लावून तिला ढकलून दिले. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी यश शर्मा याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

खोलीत घुसून मारहाण

या घटनेनंतर सकाळी ५.३० च्या सुमारास यश हा त्याच्या साथीदारांसह पाचव्या मजल्यावरील ५५०८ क्रमांकाच्या खोलीत आला. त्यावेळी राजा रंगूनवाला, सोहेल रंगूनवाला, झेन, राजा शरीफ, साहील, तौसिफ, फैजल, सैफ रंगुनवाला, यश गावंडे, विनय भांगे व इतर हे यशच्या खोलीत आले. काचेच्या बाटलीने यशच्या डोक्यावर, हातावर वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT