Nagpurkars presence at the event held in Delhi 
नागपूर

दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये पार पडला तबलिगी जमातचा कार्यक्रम अन्‌ नागपूर आले धोक्‍यात

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना विषाणूचा धोका पाहता गर्दी टाळण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. दुसरीकडे दिल्लीतील निजामुद्दीमध्ये आयोजित तबलिगी जमातच्या कार्यक्रमात देशविदेशातून हजारो लोक उपस्थित झाले होते. यात विदर्भातील 68 लोक सहभागी होते. यातील 67 जण एकट्या नागपूर जिल्ह्यातील आहेत. योतील 56 लोकांना नागपूर येथील आमदार निवासमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती आहे. 

कोरोनाच्या विषाणूने जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. लाखो लोकांना याचा लागण झाली असून, हजारोंचा मृत्यू झाला आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारकडून कसोशिचे प्रयत्न होत आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने गर्दी टाळण्याचे आवाहन सरकारने केले आहे. संचारबंदी सोबल लॉकडाऊन सारखे कठोर पावले उचलण्यात येत आहे. 

परंतु, काही दिवसांपूर्वी दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये तबलिगी जमातचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला देशविदेशातून हजारो लोकांनी उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या काहींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने मोठी खळबळ उडाली. यामुळे सुरक्षेचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे.

या लोकांनापासून इतरांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असल्याचे सुरक्षा व आरोग्य यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली आहे. या कार्यक्रमाला विदर्भातील 68 जण सहभागी झाले होते. यात एक यवतमाळ तर उर्वरित नागपूर जिल्ह्यातील आहेत. विशेष म्हणजे 59 जण हे नागपूर शहरातील असून, विविध भागातील रहिवासी आहेत. आठ जण ग्रामीण भागातील आहेत. 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सर्वांची माहिती प्रशासनाने गोळा केली असून, त्यांचा पत्ता व मोबाईल क्रमांकही मिळविला आहे. यातील 56 जणांना आमदार निवासमधील विलगीकरण कक्षात आणण्यात आल्याची माहिती आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT