Nagpur Heat Sakal
नागपूर

Heat Action Plan : देशातील शहरांना लागू होणार नागपूरचा ‘हीट ॲक्शन प्लान’

देशात दीर्घकालीन हीट ॲक्शन प्लानसाठी नागपुरातील तापमानाचा गेल्या दहा वर्षांपासून अभ्यास केला जात आहे.

राजेश प्रायकर ः @rajeshp_sakal

देशात दीर्घकालीन हीट ॲक्शन प्लानसाठी नागपुरातील तापमानाचा गेल्या दहा वर्षांपासून अभ्यास केला जात आहे.

नागपूर - राष्ट्रीय स्तरावर एकच ‘हिट ॲक्शन प्लान’ तयार होत असून सध्यास्थितीतील उष्माघाताशी लढण्यासाठी असलेल्या कृती आराखड्यात त्याचा समावेश होणार आहे. विशेष म्हणजे देशातील शहरांसाठीचा ‘हीट ॲक्शन प्लान’ नागपुरातील विविध भागांतील तापमानाचा अभ्यास करून तयार करण्यात आला आहे.

व्हीएनआयटीच्या आर्किटेक्चर विभागाच्या डॉ. राजश्री कोठारकर यांनी ‘ड्राफ्ट मॉडेल’ तयार केले असून ते राष्‍ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाकडे सोपविण्यात येणार आहे. सध्या प्रत्येक राज्याचा वेगळा हीट ॲक्शन प्लान आहे. महाराष्ट्रातही अंमलबजावणी केली जाते. परंतु हा उष्माघात कृती आराखडा दीर्घकालीन नाही. उद्यान सुरू करणे, दुपारी नागरिक, मजुरांना विश्रांतीचे आवाहन करणे, ठिकठिकाणी प्याऊ उघडणे एवढीच सध्यास्थितीत ‘हीट ॲक्शन प्लान’ची मर्यादा आहे.

परंतु यावर अधिक काम करून देशातील इतर शहरांसाठी ‘हीट ॲक्शन प्लान’ एकच असावा, हा दृष्टिकोन ठेऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ही जबाबदारी नागपुरातील व्हीएनआयटीमधील आर्किटेक्चर विभागाच्या डॉ. राजश्री कोठारकर यांच्यावर सोपवली.

गेल्या दहा वर्षांपासून त्या यावर काम करीत आहेत. देशात दीर्घकालीन हीट ॲक्शन प्लानसाठी नागपुरातील तापमानाचा गेल्या दहा वर्षांपासून अभ्यास केला जात आहे. शहरातील विविध भागातील तापमानाचा अभ्यास करण्यात आला.

कुठल्या भागात जास्त, कुठे कमी तापमान आहे, या तापमानाचा लोकांवर काय परिणाम होतो, उंच इमारती असलेल्या भागात तसेच झाडे असलेल्या भागातील रहिवाशांवर कुठला परिणाम होतो यावर अभ्यास करून ड्राफ्ट तयार करण्यात आला. याशिवाय जगभरातील हिट ॲक्शन प्लानचाही अभ्यास करण्यात आला. स्थानिक वातावरणानुसार उपाययोजना सुचविण्यात येत असल्याचे डॉ. राजश्री कोठारकर यांनी नमूद केले.

शहरात उन्हाळ्यातील स्थिती

  • शहराच्या ‘आउटर’ भागात दिवसाला तापमान जास्त व रात्री थंड.

  • जुन्या दाट वस्तीच्या भागात दिवसाला तापमान कमी, रात्रही दिवसाप्रमाणेच.

नागपुरातील कोणत्या भागात तापमानाची स्थिती काय आहे, याबाबत गेल्या दहा वर्षांपासून अभ्यास केला. त्यानुसार देशातील सर्वच शहरासाठी उपयोगात येईल, अशा हीट ॲक्शन प्लानचे मॉडेल तयार करण्यात आले. नुकताच कार्यशाळेत राष्‍ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना तसेच आयआयटी मुंबईतही सादरीकरण करण्यात आले. येत्या काळात ड्राफ्ट मॉडेल राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सोपविण्यात येईल.

- डॉ. राजश्री कोठारकर, आर्किटेक्चर विभाग, व्हीएनआयटी, नागपूर.

तापमानापासून बचावासाठी झाडे

  • शहरात रस्त्याच्या बाजूला, उद्यानात तसेच मोकळ्या जागेत बकुळीचे झाड लावावे.

  • याशिवाय आपल्या वातावरणात जगेल अशी कोणतीही झाडे लावणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT