file photo 
नागपूर

व्वा...नागपूरची सिया अमेरिकेत खेळणार

नरेंद्र चोरे

नागपूर : शिवाजीनगर जिमखानाची बास्केटबॉलपटू सिया देवधर हिला अमेरिकेतील शाळेची शिष्यवृत्ती मिळाली असून, यामुळे आता तिला तेथील शालेय व क्लबकडून खेळण्याची संधी मिळणार आहे.


१७ वर्षीय सियाची आतापर्यंतची चमकदार कामगिरी पाहून विचिता (कॅन्सस) येथील लाइफ प्रेप अकादमीचे मुख्य प्रशिक्षक व एनबीएचे ग्लोबल डायरेक्टर ब्लेअर हार्डीक यांनी ऑफर दिली होती. सियाने ही ऑफर स्वीकारली. या अंतर्गत सिया आता बारावीची परीक्षा अमेरिकेत देणार आहे. शिवाय ती अकादमीकडून शालेय स्पर्धा तसेच हुप्स क्लबकडून आंतरक्लब स्पर्धेतही खेळणार आहे. उल्लेखनीय म्हणजे तिच्या राहण्या-खाण्याची तसेच निवासाची सर्व सोय शाळेतर्फे करण्यात येणार आहे. सियाने चांगली कामगिरी केल्यास भविष्यात तिला तेथील कॉलेजकडून आणि नंतर महिलांच्या एनबीएमध्येही संधी मिळू शकते.


अशाप्रकारची शिष्यवृत्ती मिळणारी सिया ही महाराष्ट्रातील पहिली व देशातील चौथी महिला बास्केटबॉलपटू ठरली आहे. पंजाबच्या दोन व केरळच्या एका खेळाडूला ही शिष्यवृत्ती मिळाली आहे. सियाला मिळालेल्या सुवर्णसंधीबद्दल तिचे प्रशिक्षक छत्रपती पुरस्कारविजेते शत्रुघ्न गोखले यांनी आनंद व्यक्त केला. यानिमित्ताने सियाला दर्जेदार शिक्षण व प्रशिक्षणासोबतच भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धेची संधीही मिळू शकते. सेंटर पॉइंट शाळेची (काटोल रोड) विद्यार्थिनी असलेली सिया गेल्या सहा वर्षांपासून शिवाजीनगर जिमखाना येथे गोखले व विनय चिकटे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करते. सियाने राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेकवेळा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. या गोल्डन ऑफरबद्दल सियानेही आनंद व्यक्त करून, याचे श्रेय प्रशिक्षक व परिवाराला दिले.

संपादन : नरेश शेळके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Megablock: पावसाचा हाहाकार अन् लोकलचा खोळंबा! मुंबईकरांनो वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, 'या' मार्गावर मेगाब्लॉक

Maharashtra Farmers: पीकविमा योजनेत डिजिटल सर्वेक्षण बंधनकारक, चार प्रमुख बदल; फसवणूक केल्यास ५ वर्षे कोणताच लाभ नाही

Marathi Live Updates : सुकळी खिंडीत पाण्याचा महासागर; गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Satara: कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार! धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक; १२ तासात ७८७ मिमी पाऊस

Cabinet Reshuffle: ते दोन केंद्रीय मंत्री कोण? भाजप कार्यालयात पोहोचताच राजीनाम्याच्या चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT