Crime Esakal
नागपूर

Nagpur Crime : विवस्त्र युवक बिनधास्त फिरला दुचाकीवर; पोलिसांनी केला गुन्हा दाखल

विवस्त्र होऊन दुचाकी चालवित शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास शहरभर फिरणाऱ्या एका ३५ वर्षीय युवकाला प्रतापनगर पोलिसांनी अटक करीत गुन्हा दाखल केला.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - विवस्त्र होऊन दुचाकी चालवित शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास शहरभर फिरणाऱ्या एका ३५ वर्षीय युवकाला प्रतापनगर पोलिसांनी अटक करीत गुन्हा दाखल केला. दरम्यान त्याचा व्हिडीओ शनिवारी (ता.१३) सकाळी व्हायरल झाल्याने शहरात खळबळ उडाली.

प्रितमकुमार बोधले ( रा. प्रतापनगर) असे या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रितमकुमार विवस्त्र आपल्या दुचाकीवर मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास खामला चौकातून प्रतापनगरकडे निघाला. तो विवस्त्र होऊन दुचाकी चालवित असल्याचे काहींनी बघितले. दरम्यान ही माहिती बीट मार्शलला मिळाली. बीट मार्शलने त्याचा पाठलाग करीत, जयताळा चौकात थाबंवून ताब्यात घेतले.

त्याने असे का केले? याबाबत तो काहीच सांगत नसल्याने त्याला ठाण्यात नेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. प्रितम वेडसर असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. अनेकदा त्याने अशाच प्रकारे घरातून निघून गेला असल्याची माहिती दिली. त्याचे स्वतःवर नियंत्रण राहात नसून त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार सुरू असल्याचेही नातेवाईकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT