nana patole esakal
नागपूर

Nana Patole : येड्याच्या सरकारमुळे राज्याचे नुकसान

राज्यात पूर्वी ईडीचे सरकार होते. आता येड्याचे सरकार असल्याची बोचरी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी केली.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - राज्यात पूर्वी ईडीचे सरकार होते. आता येड्याचे सरकार असल्याची बोचरी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी केली. कॅगचा अहवाल तसेच राज्यात एसटी महामंडळासाठी खाजगी व्यक्तीकडून बसेस खरेदी केल्या जात असल्याने भाजपचा भ्रष्ट चेहराही उघड पडल्याचा आरोप त्यांनी केला.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले असता विमानतळावर पत्रकारांसोबत बोलत होते. त्यांनी राज्यातील तसेच केंद्रातील भाजप नेतृत्त्वातील सरकारवर तोंडसुख घेतले. पूर्वी ईडीचे सरकार होते, असे नमूद करीत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

आता सरकारमध्ये अजित पवार सामील झाल्याने हे येड्याचे सरकार असल्याची टीका त्यांनी केली. या सरकारमुळे राज्याच्या विकासाला ब्रेक लागला आहे. एसटी महामंडळात अनेक बसेस खाजगी व्यक्तीकडून विकत घेण्यात आल्या. भ्रष्टाचार येड्याचे सरकार लूट करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी कॅगच्या अहवालावरून केंद्र सरकारवरही टीका केली.

हे सरकार शेतकरीविरोधी तसेच कामगार विरोधी आहे. शेतकऱ्यांना बरबाद करण्याचे नियोजन सरकारने केले. त्यामुळे आता घरी जाण्याची वेळ आल्याने भाजप घर चलो अभियान राबवत असल्याची टीकाही त्यांनी केली. हिंदू मुस्लिम वाद पेटवण्यात भाजप तरबेज आहे. गुजरात व केंद्रात भाजप सरकार असल्याने याबाबत काळजी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले. निवडून येण्याच्या क्षमतेवर राज्यात महाविकास आघाडीत जागा वाटप होईल, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले.

फडणवीसांचा मुख्यमंत्रीपदावर डोळा

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदावर डोळा आहे. ते गृहखात्याचा वापर व्यक्तिगत फायद्यासाठी करीत आहेत. विरोधात बोलणाऱ्यांवर मकोका लावला जात आहे. मागील काळात गुजरातमध्ये असलेली हुकूमशाही महाराष्ट्रात निर्माण केली जात आहे का, असा प्रश्न जनतेपुढे असल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crop Insurance: दुष्काळ जाहीर झाला! पीक विम्यासाठी काय करावं? किती पैसे मिळणार? पाहा संपूर्ण गणित

Asian Games 2026: अरे आवाजsss कुणाचा... भारतीय पुरुष कबड्डी संघाने जिंकले नववे सुवर्णपदक; रोमहर्षक लढतीत इराणवर विजय

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा अपघात! थांबलेल्या टँकरला धडकून कारचा चुराडा, एकाचा मृत्यू

Dattatray Bharne Drought Relief : महाराष्ट्रातील दुष्काळावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले? किती टप्प्यात मदत करणार?

पुण्यात पोलिसाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं, PMPLच्या बस डेपोत आढळला मृतदेह; ३ दिवसांपासून होते बेपत्ता

SCROLL FOR NEXT