nana patole criticized sanjay raut on upa leader statement in nagpur 
नागपूर

संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते, नाना पटोलेंचा घणाघात

भाग्यश्री राऊत

नागपूर : खासदार संजय राऊत हे आता शरद पवारांचे प्रवक्ते झाले आहेत. शिवसेनेचे खासदार राहिलेले नाहीत. कारण ते अशा प्रकारचे वक्तव्य सातत्याने करत असतात. सेना यूपीएचे कुठलेही सदस्य नाही. त्या पद्धतीचे वक्तव्य करण्याचा अधिकार राऊतांना नाही. पण अजूनही संजय राऊत या पद्धतीचे वक्तव्य करतात. याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार आहे. आमच्या नेत्यांबद्दल कुठल्याही व्यक्तीने या पद्धतीचे वक्तव्य करणे हे आम्हाला मान्य नाही, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. यूपीएच्या नेतृत्व पदावरून संजय राऊतांनी वक्तव्य केले होते. त्यावरूनच नानांनी संजय राऊतांचा समाचार घेतला आहे. 

सुरुवातीपासून काँग्रेसची भूमिका अशीच राहिली की कुठल्याही अधिकाऱ्यानी कुठल्याही सरकारची कठपुतली बनू नये. त्या व्यवस्थेचा फायदा सामान्य जनतेला मिळावा, हीच जबाबदारी त्या व्यक्तीची असते. पण काही काळापासून आपण पाहत आहोत, की काही अधिकारी एखाद्या पक्षाला समर्पित होऊन त्यानुसार काम करताना दिसतात. हे लोकशाहीसाठी घातक आहे. रश्मी शुल्काच्या प्रकरणामध्ये जे काही समोर आले त्यावर चौकशी सुरू झाली आहे. त्यानुसार जे काही पुढे येईल त्यानुसार कारवाई होईल, अशी आमची भूमिका आहे.

फडणवीसांनी गेल्या वर्षभरापासून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. त्यावरून त्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली आहे. खोटे बोलावं पण रेटून बोलावं अशी भूमिका फडणवीसांची राहिली आहे. त्यांचे कुठलेही आरोप खरे निघाले नाहीत. त्यामुळे त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. लवकरच जस्टीस लोयासारखे प्रकरण देखील पुढे येतील, असे म्हणत त्यांनी फडणवीसांना इशारा दिला आहे. 

एका वरिष्ठ अधिकाऱ्यानी असा आरोप गृहमंत्र्यांवर करावा हे गंभीर आहे. कुठल्याही अधिकाऱ्याला न्यायालयात जाताना शासनाची परवावनगी घ्यावी लागते. केंद्र शासनाच्या आशीर्वादाने हे होत आहे. कारण रोहतगी हे केंद्राचे वकील आहेत आणि आता तेच परमबीर सिंग यांचे वकील आहेत. त्यामुळे यांच्यामध्ये काय कनेक्शन आहे, हे जनतेला कळेलच, असेही पटोले म्हणाले. 

मुख्य सचिवांनी तयार करून दिलेला अहवाल मंत्र्यांनी लिहून दिला, हे बालिशपणाचं वक्तव्य मुख्यमंत्री राहिलेल्या विरोधी पक्षनेत्यांना शोभत नाही, असेही नाना म्हणाले. पुलवामामधील दारूगोळा हा नागपूरमधूनच गेली होता. अंबांनींच्या घरांसमोर सापडलेली जिलेटीन देखील नागपूरमधून गेलेत. त्यामुळे नेमके नागपूरचे काय कनेक्शन आहे, हे देखील शोधावे लागेल असेही ते म्हणाले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 5 दिवसांतच 1 लाखाचे झाले 3 लाख! 300% रिटर्न देणाऱ्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल

आरक्षणावरून सुरू झाला वाद अन् कॉलेजमध्ये पेटलं वातावरण! कसा आहे ‘जयंती २’? वाचा Review

Hindi Medium Engineering: इंग्रजीची अडचण दूर! आता चक्क हिंदीतून सिव्हिल इंजिनिअरिंग; विद्यार्थ्यांना मिळणार रु. २ लाखांचे अनुदान

Latest Marathi News Live Update : राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

Ganeshotsav 2026: हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी का? पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? | Ganesh Chaturthi 2026

SCROLL FOR NEXT