Nana Patole  Sakal
नागपूर

Nana Patole : वादाच्या जागेवर एकत्रित बसून तोडगा काढू : नाना पटोले

Nana Patole : महाविकास आघाडीत विधानसभेच्या निवडणुकीत जागा वाटपावर वाद निर्माण होऊ नये, यासाठी नाना पटोले यांनी सामंजस्याने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. अद्याप कोणत्याही पक्षाने उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत वाद निर्माण होऊ नये, सामंजस्याने यावर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे अशा मतदारसंघातील महाविकास आघाडीने जागा फायनल केलेल्या नाहीत.

अशा जागांवर लवकरच एकत्रित बसून तोडगा काढला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. विधानसभेच्या जागा अधिक असल्याने अनेक ठिकाणी वादाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

महाविकास आघाडीत यावरून मिठाचा खडा पडू नये याची खबरदारी घेतली जात आहे. अद्याप एकाही पक्षाने परस्पर उमेदवार जाहीर केलेला नाही. कार्यकर्त्यांचा असंतोष असलेल्या वादाच्या जागा किती आहेत त्या सांगण्यास नाना पटोले यांनी नकार दिला. त्या जागा फायनल केलेल्या नाहीत.

मात्र नक्कीच यावर तोडगा निघेल असाही विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एमआयएमने २८ जागांचा प्रस्ताव दिला यावर पटोले यांनी मला माहिती, माझ्याकडे कोणी प्रस्ताव घेऊन आला नसल्याचे स्पष्ट केले. शरद पवार यांनी आरक्षणाची मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत वाढवावी असे सांगितले. यावर पटोले यांनी राहुल गांधी यांची भूमिका त्या पलीकडे असल्याचे सांगितले.

जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे ही राहुल गांधी यांची मागणी आहे. लोकसभेच्या निवडणुकीपासून काँग्रेसने ही मागणी लावून धरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीतून बाहेर पडत नसून त्यांना बाहेर काढले जात आहे.महायुतीत जागा वाटपावरून ज्या घडामोडी सुरू आहे हे स्पष्टपणे दिसून येते असे पटोले यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Mhaishale Case Sangli : सांगलीत लपला होता रोहित म्हैशाळे हत्याकांडाचा 'मास्टरमाइंड'; कोण आहे 'गोट्या'? त्याचा दलित महासंघाच्या नेत्याच्या खुनाशीही संबंध?

Bigg Boss Marathi 6 : या आठवड्यात टोळीमधून होणार धक्कादायक एव्हिक्शन ! सगळ्यांना भिडणारी 'ही' स्पर्धक बाहेर

Latest Marathi News Live Update : अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का, जिल्हा उपाध्यक्षांचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा

Mumbai News: कपडे फाटेपर्यंत मारेन…, महिला ट्रॅफिक पोलिसांसोबत प्रवाशाचे अश्लील वर्तन; मुंबईत नेमकं काय घडलं? VIDEO VIRAL

Vasota Fort Tourism Development : वासोटा किल्ल्याचं रूप पालटलं! आता दरीच्या टोकावर उभं राहून फोटो काढणं होणार सोपं; गडावर वन विभागानं असं काय केलंय?

SCROLL FOR NEXT