chandrashekhar bawankule chandrashekhar bawankule
नागपूर

‘नाना पटोलेंचे मंत्रीसुद्धा ऐकत नाही; ते हतबल प्रदेशाध्यक्ष’

ओबीसींचा इम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी मागासवर्ग आयोगाला दिलेले पाच कोटी रुपये तुटपुंजे आहे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा उमेदवार जिल्ह्यातील दोन मंत्र्यांनी बदलावला. त्यांचे मंत्रीसुद्धा ऐकत नाही हे यावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी ऊर्जामंत्री तसेच विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली.

नाना पटोले यांनी रवींद्र भोयर यांना उमेदवारी दिली होती. त्यांची हमीसुद्धा घेतली होती. मात्र, त्यांना काँग्रेसच्या नेत्यांनी असमर्थ ठरविले. मतदानाच्या आदल्या दिवशी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसने पाठिंबा दिला. त्यामुळे प्रदेशाध्यक्षाची नाचक्की झाली आहे. दोन मंत्र्यांच्या दबावात नागपूर विधान परिषदेचा उमेदवार काँग्रेसने (Congress) बदलला. एवढे हतबल प्रदेशाध्यक्ष काँग्रेसने प्रथमच बघितले असेल असेही बावनकुळे म्हणाले.

ओबीसींचा इम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी मागासवर्ग आयोगाला दिलेले पाच कोटी रुपये तुटपुंजे आहे. ४०५ कोटींचा प्रस्ताव असताना ५ कोटी रुपये देने ही शरमेची बाब आहे. मंत्रिमंडळात अनेक ओबीसी मंत्री आहेत. पाच कोटीत काहीही होणार नाही. यावरून महाविकास आघाडीला ओबीसी समाजाला आरक्षण मिळू द्यायचे नाही हे दिसून येते. ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही तोवर राज्यात कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक घेण्यात येऊ नये अशी मागणीही बावनकुळे यांनी केली.

भाजपला ३१८ पेक्षा जास्त मत मिळेल

विधान परिषदेच्या निवडणुकीत घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे मनोबल खचले आहे. सर्वच मतदान संभ्रमात होते. १४ तारखेला होणाऱ्या मतमोजणीत हे दिसणारच आहे. भाजपला (BJP) ३१८ पेक्षा जास्त मत मिळेल, असाही दावा बावनकुळे यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: न्यायव्यवस्थेवर टीका करण्यास आक्षेप नाही, पण... सर्वोच्च न्यायालयाचा इशारा, दिली कौतुकास्पद शिक्षा

सगळीकडे 'डाइनिंग विद द कपूर्स'ची चर्चा पण शोमधून आलिया भट्ट गायब; राज कपूर यांच्या नातवाने सांगितलं कारण

Nitish Kumar oath ceremony : नितीशकुमार आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची दहाव्यांदा शपथ घेणार, मोदींची 'ग्रँड एन्ट्री' होणार!

दुर्दैवी घटना ! 'काशीळमधील अपघातात ट्रकचालक ठार'; राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत रास्ता रोको, चाकच अंगावरून गेलं अन्..

Face Yoga Exercises: हिवाळ्यात चमकदार त्वचा हवी? मग रोज 'फेस योगा' करा!

SCROLL FOR NEXT