नागपूर

काँग्रेस आमदारांची शंका खरी; राष्ट्रवादी-शिवसेनेचा ओबीसी आरक्षणाला विरोध

राजेश चरपे

नागपूर : ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहे, अशी आम्हाला सुरुवातीपासूनच शंका आहे. काँग्रेसच्या एका आमदाराने ती बोलूनसुद्धा दाखवली आहे. आघाडीला ओबीसींविषयी खरोखरच जिव्हाळा असेल तर इम्पेरिकल डाटा गोळा करण्यासाठी तत्काळ ओबीसी आयोगाला ४३५ कोटी रुपये देण्याची मागणी, माजी मंत्री तसेच भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत केली.

आपण नुकतीच आरक्षणा संदर्भात ओबीसी खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. त्यांनी हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवणार असल्याचे सांगितले. वडेट्टीवारांच्या हेतूबद्दल आम्हाला शंका नाही. परंतु, कॉंग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी आरक्षणाच्या विरोधात असल्याचे वक्तव्य केले आहे. ज्या पद्धतीने सध्या चालढकल सुरू आहे त्यावरून आमची शंकाही बळावली असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

कोणी कोणावर उगाच शंका घेत नाही. त्यातही आपल्याच सरकारच्या विरोधात सहसा कोणी बोलत नाही. वंजारी यांना निश्चितच काही तरी माहिती असल्याने ते बोलले. शिवसेना व राष्ट्रवादीच्यावतीने अद्याप त्यांचे आरोप खोटे ठरवले नाही किंवा खंडनही केले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी ओबीसींविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही बावनकुळे यांनी केली.

आयोगाला निधी द्या

इम्पिरिकल डेटा तयार करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करण्यात आला आहे. त्यांना मनुष्यबळ व डाटा गोळा करण्यासाठी निधी देणे गरजेचे आहे. आयोगाने ४३५ कोटी रुपये देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. त्यानुसार आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने आयोगाला निधी देऊन आरक्षणाचा विषय मार्गी लावावा, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : पहिल्या घासाला खडा

Horoscope Prediction : आज धनयोग + सर्वार्थ सिद्धी योग! 'या' 5 राशींना होणार धनलाभ अन् भगवान विष्णू अनेक अडचणी दूर करणार!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 नोव्हेंबर 2025

ढिंग टांग : बिबटे : ठिपके आणि ठपके..!

Horoscope : शुक्र ग्रहात विशेष गोचर! बनतोय लक्ष्मी नारायण योग; 'या' राशीच्या लोकांच्या अपूर्ण इच्छा होणार पूर्ण, पैशाची अडचण संपणार

SCROLL FOR NEXT