Navratri festival 2022  
नागपूर

Navratri Festival 2022 : तुम्हाला मुलगी आहे का? मग हे वाचाच

एक दिवा कन्येसाठी, तिच्या उज्ज्वल उद्यासाठी

सकाळ वृत्तसेवा

कन्येच्या अर्थात मुलीच्या उज्ज्वल उद्याचा विचार करीत, `सकाळ`ने एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कन्येच्या संपूर्ण विकासाचा `प्लॅन` नवरात्रोत्सवाच्या काळात देण्याचे नियोजन केले आहे. `सकाळ` वाचणे एवढीच एक आपुलकीची अट यासाठी ठेवली आहे.

नवरात्र हा देवीच्या सन्मानाचा सण. भारतीय परंपरेत या सणाला अत्यंत महत्त्व आहे. परंपरेनुसार आपण स्त्रियांना देवीसम मानतो. नवरात्रात कन्यापूजनही करतो. परंतु एरवी वर्षभर आपण काय करतो? खरेच आपण कन्येचा सन्मान करतो का? मागील चार वर्षांत घसरलेला कन्या जन्मदर आणि लोकसंख्येतील व्यस्त प्रमाण काय सिद्ध करते? नवरात्रातील नऊ दिवस देवीचे पूजन करायचे आणि उर्वरित वर्षभर देवीसमान कन्येकडे दुर्लक्ष करायचे? भारतीय परंपरेने जे महान स्थान कन्येला बहाल केलेले आहे, ते पुन्हा तिला प्राप्त करून देण्यासाठी एक पाऊल आता पुढे यायचे आहे.

`सकाळ` काय करणार?

कन्येच्या संपूर्ण आणि सर्वांगीण विकासाचा ज्येष्ठ तज्ज्ञांनी तयार केलेला `प्लॅन` नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत आम्ही रोज `सकाळ`मधून तुम्हाला देणार आहोत. तो वाचला आणि त्याची अंमलबजावणी केली तर निश्चितच तुमच्या कन्येचे भविष्य उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. `सकाळ`वर तुम्ही भरभरून केलेल्या प्रेमापोटी दिलेली ही ग्वाही आहे.

तुम्ही काय करायचे?

रोज `सकाळ` वाचायचा. कन्येच्या सन्मानाचा निश्चय करायचा. तिच्या उज्ज्वल उद्याची मनोभावे कामना करीत घटस्थापनेपासून रोज एक दिवा कन्येसाठी लावायचा. आणि हो...कन्यासन्मानाचा हा सोहळा कॅमेराबद्ध करीत `सकाळ`कडे पाठवायचा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT