navratri sakal
नागपूर

Navratri Festival 2023 : आजपासून आदिशक्तीचा जागर; घटस्थापनेची तयारी पूर्ण रोषणाईने न्हाऊन निघाली मंदिरे

नवरात्रीची, घरातील घटस्थापना असो किंवा दांडिया, तरुणाई सज्ज झाल्याचे दिसत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - ‘प्रेम से बोलो, जय माता दी’, ‘जयकारा शेरावाली मा का, बोलो साचे दरबार की जय...’ असा गजर करीत मूर्तीकारांकडे चाललेले तरुण, घटस्थापनेसाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करण्याची सुरू असलेली लगबग, सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचे मंडप उभारणीचे अंतिम टप्प्यात आलेले काम... असे वातावरण शनिवारी उपराजधानीत नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीला दिसून आले.

शहरामध्ये रविवारी (ता. १५) ठिकठिकाणी घटस्थापना होणार असून आदिशक्तीच्या जागराला सुरुवात होणार आहे. काही सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांमध्येही घट बसवतात तर काही ठिकाणी देवीची सुंदर मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. मागील २ वर्षांपासून कोरोनामुळे साध्या पद्धतीने उत्सव साजरे केले जात होते. गेल्या वर्षीपासून गणेशोत्सवाचा सणही थाटात साजरा करण्यात आला आहे.

नवरात्रीची, घरातील घटस्थापना असो किंवा दांडिया, तरुणाई सज्ज झाल्याचे दिसत आहे. अनेकांच्या घरी घट बसवले जातील. याशिवाय शहरातील पारडी येथील भवानी माता मंदिर, गणेशपेठ येथील आग्याराम देवी मंदिर, छावनी येथील देवीचे मंदिर, मनीषनगरातील देवीच्या मंदिरांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून उत्सवी वातावरण दिसून येत आहे. उद्यापासून दहा दिवस गरबाचीही धूम राहणार असून विविध संस्थांनी आयोजन केले असून तरुणाई नृत्यासाठी नियोजन केल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress MLC Candidate Maharashtra : तीन वाजेपर्यंत थांबा काँग्रेसचा उमेदवार समजेल, नाना पटोले स्पष्टच म्हणाले; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य

Bank News: कामाची बातमी! 1 मे ला बँका बंद की सुरू? RBI ची मोठी अपडेट

Latest Marathi News Live Update : नाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच द्या - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Delhi Mumbai Expressway Accident : सीएनजी लिक होऊन धावती कार पेटली; वैष्णोदेवी दर्शनाहून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

IPL 2026 : दोन मॅच, जिथे मुबंई इंडियन्सने माती खाल्ली! R Ashwin ने पोलखोल केली; म्हणाला, आता सर्व ६ सामने जिंकणे अशक्य

SCROLL FOR NEXT