Anil deshmukh 
नागपूर

Anil deshmukh: धन्यवाद फडणवीसजी! नागपूरमधील बॅनरचा फोटो शेअर करत देशमुख म्हणाले, आता नवीन अंक...

Anil deshmukh criticize devendra fadnavis On banner in nagpur: अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करून टीका केली आहे.

कार्तिक पुजारी

Nagpur News: माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच नागपूरमध्ये काही बॅनर लागले आहेत. यावरून अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करून टीका केली आहे.

धन्यवाद देवेंद्र फडणवीसजी! महाराष्ट्रात तुम्ही किती घाणेरडे व खालच्या थराचे राजकारण करत आहात, याचा नवीन अंक आज नागपूरच्या जनतेला पुन्हा एकदा तुमच्या कडून पाहायला मिळाला. लक्षात असू द्या...जनता जनार्दन हैं!, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत.

भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाकडून नागपूरमध्ये काही बॅनर लावण्यात आले आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा फोटो आहे, त्यांच्या बाजूला अनिल देशमुख यांना तुरुंगात दाखवण्यात आलं आहे. बॅनरवर 'विकास वृत्ती, वसुली बुद्धी' असा मजकूर लिहिण्यात आला आहे. हे पोस्टर अनिल अनदेशमुख यांच्या जिव्हारी लागल्याचं दिसत आहे.

अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांना ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी ऑफर देण्यात आली होती, असं ते म्हणाले होते. हे सर्व आरोप देवेंद्र फडणवीसांनी फेटाळले आहेत. मात्र, तुरुंगात असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने अनिल देशमुख यांच्यावर आरोप केला आहे. त्यामुळे याला आणखी हवा मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.

देवेंद्र पडणवीस यांची प्रतिक्रिया

परमवीर सिंहांनी अनिल देशमुखांवर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांचे आरोप कपोलकल्पीत आहेत. मी याविषयी जास्त बोलत नाही. कारण, दररोज कोणी यावर बोलत असेल तर त्याला उत्तर देऊन मला त्यांच्या पातळीला जायचं नाही. चांदिवाल आयोगाचा अहवाल महाविकास आघाडीच्या काळातच आला आहे. त्याच्यावर कारवाई झाली नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT