नागपूर

Rohit Pawar: 'छगन भुजबळ भाजपवासी होतील', रोहित पवारांची मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका

'त्यांना जनताच रडवेल' ! रोहित पवारांचे वक्तव्य, छगन भुजबळ यांच्यावरही केली बोचरी टीका

सकाळ डिजिटल टीम

Rohit Pawar on Chhagan Bhujbal: पक्षासोबत बंडखोरी करून जे लोक सत्तेसाठी भारतीय जनता पक्षासोबत गेले त्यापैकी अनेक जण भाजपवासी होतील त्यामधे छगन भूजबळ भाजपच्या वाटेवर वाटचाल करीत आहेत अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी केला. वाशीम येथील शिवाजी हायस्कूलमधे ते माध्यमांशी बोलत होते.

आमदार रोहीत पवार व रोहीत पाटील युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून वाशीम जिल्ह्य़ात आहेत. या यात्रेच्या दुसर्या दिवशी येथील शिवाजी हायस्कूल येथे त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधतांना राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवर भाष्य केले. सध्या निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू असून जे नेते निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आम्हाला रडविण्याची भाषा करतात त्यांना 2024 निवडणुकीत जनताच रडवेल असा टोला लगावला.

भाजपचे राज्यातील व देशातील सरकार जनतेला नकोशे झाले असून येत्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असेही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाराव पाटील खडसे, माजी जिल्हाध्यक्ष पांडुरंग ठाकरे, डाॅ. भगवानराव गोटे ,सुनिल पाटील अमित पाटील खडसे यांची उपस्थिती होती.

एमआयडीसीला भेट

आमदार रोहीत पवार यांनी येथील औद्योगिक वसाहतीला भेट देऊन उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या. काही समस्यांचे निराकरणही केले. यावेळी डाॅ. अंगद राऊत, कृष्णा चौधरी, सुभाषराव बोरकर यांची उपस्थिती होती. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT