नागपूर

राष्ट्रवादीला काँग्रेसकडून भीती; आघाडी तुटण्याची शक्यता

नीलेश डोये

नागपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी (Zilla Parishad and Panchayat Samiti elections) होत असलेल्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच दिवस शिल्लक असताना अद्याप कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीची जागा वाटपाची चर्चा (There is no Congress and NCP discussion) झालेली नाही. त्यामुळे आघाडी केव्हाही तुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (NCP-ready-to-contest-16-Zilla-Parishad-seats)

दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी आम्ही एकत्रित लढणार असल्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात काँग्रेसने सर्व १६ जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यामुळे राष्ट्रवादीची धाकधूक वाढली आहे. गाफील ठेवून गेम होण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादीनेसुद्धा सर्व जागांसाठी इच्छुकांना तयारी ठेवण्याचे निर्देश दिले. सोबतच त्यांच्या मुलाखतीसुद्धा घेतल्या.

सार्वत्रिक निवडणुकीत एकत्रित लढल्यानंतर काँग्रेसने शेवटपर्यंत राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद दिले नाही. सत्तेत पन्नास टक्के वाटा देण्यास स्पष्ट नकार दिला. एक सभापतिपद दिले मात्र त्यासाठी चांगलेच झुलवले होते. राष्ट्रवादीच्यावतीने खासदार प्रफुल पटेल आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपाध्यक्षपद देण्याची मागणी केली होती. मात्र, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी ती फेटाळून लावली होती.

दुसरीकडे काँग्रेसशिवाय राष्ट्रवादीला दुसरा पर्यायसुद्धा नाही. त्यामुळे काँग्रेस म्हणेल त्यानुसार त्यांना फरफटत जावे लागत असल्याचे दिसून येते. याची प्रचिती पुन्हा येणार असल्याचे शंका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आली आहे. सध्या अनिल देशमुख अडचणीत असल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी ठोसपणे काँग्रेससोबत बोलणारा दुसरा नेता नाही.

राष्ट्रवादीच्या उमेदवाराला हवे काँग्रेसचे तिकीट

हिंगणा तालुक्यातील पंचायत समितीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याला काँग्रेसची उमेदवारी हवी आहे. काँग्रेसने त्यांना खुली ऑफर दिली आहे. त्यामुळे या जागेसाठी पेच निर्माण झाल्याचे समजते.

(NCP-ready-to-contest-16-Zilla-Parishad-seats)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Gaikwad Reaction : शेतकरी संकटात अन् मंत्री फुलांवरून चालले; संजय गायकवाडांचा शिरसाटांना घरचा आहेर

Sangli Water Restriction:धरणे तुडुंब भरलेली असताना उपसाबंदी कशासाठी? राजू शेट्टींचा शासनावर हल्लाबोल : सांगली-कोल्हापुरात पहिल्यांदाच निर्णय

Thailand Ganeshotsav : ढोल-ताशांचा गजर, भक्तिगीते अन् गणेश विसर्जन मिरवणूक; बँकॉकमध्ये रंगला गणेशोत्सव

Marathi News Live Updates : प्रसूतीदरम्यान नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरवर निलंबनाची कारवाई

लालबागच्या राजाच्या चरणांचं कुंकू पत्नीच्या भांगेत भरलं अन्...; संजय दत्तचा Viral Video, नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT