file photo 
नागपूर

वेडा नाही कधीही लॉकडाऊन करायला, कोण म्हणाले असे...

नीलेश डोये

नागपूर : मी वेडा नाही, कधीही लॉकडाउन करायला, अशा शब्दात पालकमंत्री नितीन राऊत यांनी केंद्र आणि अचानक जनता कर्फ्यू जाहीर करणाऱ्या मनपाचे पदाधिकारी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर नाव न घेता टीका केली. लॉकडाऊन पर्याय नाही असे सांगणाऱ्या पालकमंत्र्यांनी यापुढचा लॉकडाऊन "स्मार्ट' राहील असे सुतोवाच करून लॉकाडाऊनचे समर्थन करून सर्वांना बुचकाळ्यात टाकले. 

लॉकडउान करण्यापूर्वी लोकांना वेळे देणे आवश्‍यक आहे. लॉकडाउन हा पर्याय नाही. यामुळे आर्थिक नुकसान होते, लोक नैराश्‍यात जातात, जेवनाचा प्रश्‍न निर्माण होतो. मागील वेळी अनेक प्रश्‍न निर्माण झाले. देशातील इतर शहरांच्या तुलनेत नागपुरातील मृत्यू दर कमी आहे. 

त्यामुळे लॉकडाऊन करायचे की नाही, करायचे असल्यास कशा प्रकारे करायचे, उद्योग, दुकाने, कामगार यांचाही विचार करण्यात येईल, असे पालकमंत्री म्हणाले. 

लॉकडाऊन सुसह्य करण्यासाठी अधिकाऱ्यांची एक समिती तयार करण्यात आली आहे. लॉकडाउन करायचे झाल्यास किमान 14 दिवसांचे असेल. जिल्ह्यात एकही मृत्यू होता कामा नये, अशी भावना आहे. त्यामुळे हा कटू निर्णय घ्यावा लागेल. पण समितीच्या सूचनांच्या आधारेच तो घेण्यात येईल. दुकानांची वेळ सकाळी 6 ते सायंकाळी 8 पर्यंत राहील. केंद्र आणि आयसीएमआर यांच्या सूचनांच्या आधारेच सर्व कार्यवाही करण्यात येत येईल. याची सर्वस्वी जबाबदारी महापालिका आयुक्तांची राहील असेही त्यांनी सांगितले. 

राखीनंतर पुन्हा लॉकडाऊन ? 

समितीच्या सूचनांच्या आधारे सर्वंकष विचार करूनच लॉकडाऊन केले जाईल. तत्पूर्वी लोकांना किमान चार दिवस देण्यात येतील. समितीच्या बैठकीला किमान दोन, चार दिवस लागणार असल्याने आठवडाभर तरी लॉकडाउन लागणार नसल्याचे स्पष्ट होते. त्यानुसार राखी नंतरच लॉकडाऊन होईल असे अप्रक्षत्यपणे संकेत त्यांनी दिले. 

काही अधिकाऱ्यांमुळे परिस्थिती चिघळली 

कोरोनाच्या नियंत्रणाकरता जबबदारी वाटून देण्यात आली आहे. विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक व इतर अधिकारी एकत्रित काम करीत होते तेव्हा परिस्थिती आटोक्‍यात होती. पण अधिकाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने परिस्थिती बिघडली आणि रुग्ण वाढले, असे सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे तुकाराम मुंढे यांच्यावर निशाना साधला. 


उत्तर न देताच निघाले राऊत 

स्मार्ट लॉकडाउनचा निर्णय घेण्यासाठी अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली. ही समिती सूचना करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. आठवडाभर पूर्वीच याबाबतची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे समितीची बैठक केव्हा होईल, या प्रश्‍नावर थेट उत्तर देण्याचे टाळले. प्रश्‍नाचा पुनरूच्चार करताच ते उत्तर न देता निघून गेले. 

मुंढेचे स्मित 

पालकमंत्री राऊत यांच्या पत्रकार परिषदेत थेट रोख मनपा आयुक्त तुकाराम मुंढेवर होता. मुंढेच्या अनेक निर्णयावर त्यांनी नाराजी दर्शविली. वाढलेल्या रुग्णांसाठी त्यांनाच जबाबदार धरले. ते बोलत असताना अधिकारी एकमेकांडे बघत होते. राऊत निघून गेल्यावर इतर अधिकारी काहीही कोणाशीच न बोलता निघून गेले. यावेळी उपस्थित मुंढे यांच्या चेहऱ्यावर मात्र स्मित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT