new 1100 corona patients today in Nagpur
new 1100 corona patients today in Nagpur  
नागपूर

उपराजधानीत कोरोना आटोक्यात येईना! सलग दुसऱ्या दिवशी अकराशेहून जास्त रूग्ण, १३ जणांचा मृत्यू

केवल जीवनतारे

नागपूर ः जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. जिल्ह्यात दोन दिवसांपासून बाधितांच्या संख्येने अकराशेपेक्षा जास्त आकडा गाठला आहे. ही धोक्याची घंटा असून जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. गुरुवारी १,११६ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.  तर मृत्यूचा टक्काही वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज मागील दोन महिन्यानंतर मृत्यूचा टक्का वाढल्याचे दिसून आले. १३ मृत्यूची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात एकाच दिवशी १३ कोरोनाबाधितांच्या मृत्यूमध्ये ९ मृत्यू हे शहरातील आहेत. २ मृत्यू ग्रामीण भागातील तर २ मृत्यू जिल्ह्याबाहेरून रेफर झालेल्या रुग्णांचे आहे. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाच्या एकूण मृत्यूची संख्या ४ हजार ३१४ झाली आहे. तर नवीन कोरोनाबाधितांमध्ये शहरातील ८२६ , ग्रामीणचे २८८, जिल्ह्याबाहेरील २ अशा एकूण १ हजार ११६ बाधितांचा समावेश झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ४६ हजार ८३१ वर पोहचली आहे. 

यात शहरातील आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या १ लाख १७ हजार २०१ तर ग्रामीण भागातील २८ हजार ६९६ रुग्णांची नोंद झाली. तर जिल्ह्याबाहेरील रुग्णांची संख्या ९३४ झाली आहे. नागपूर शहरातील आतापर्यंत मृत्यूची संख्या २,७९२ झाली आहे. तर ग्रामीण भागात ७७० रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. जिल्ह्याबाहेरील मृत्यूची संख्या ७५२ झाली आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजार ६५८ झाली आहे. तर ग्रामीण ६०१ अशी एकूण ७ हजार २५९ रुग्णांवर पोहोचली आहे. १ हजार २४३ कोरोनाबाधितांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तर ४ हजार ९०० रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत.

आज कोरोनामुक्तांचा टक्का वाढला

गरूवारी जिल्ह्यात १ हजार ०२८ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. यातील ९६२ जण शहरातील तर ६६ जण ग्रामीण भागातील आहेत. यामुळे आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्या एकूण कोरोनामुक्तांची संख्या १ लाख ३५ हजार २५८ झाली आहे. यातील १ लाख ८ हजार ७२२ शहरातील तर २६ हजार ५३६ ग्रामीण भागातील आहेत.

तीन दिवसात ३२ हजार चाचण्यांचा विक्रम

शहरी भागात बुधवारी दिवसभरात शहरात ६,३६६ आणि ग्रामीणला ४ हजार २४५ अशा एकूण १० हजार ६११ संशयित रुग्णांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून चाचण्यांची संख्या वाढत आहे. तीन दिवसांत ३२ हजार चाचण्यांचा विक्रम जिल्ह्यात नोंदवला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

Omprakash Raje Nimbalkar : जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर - ओमराजे निंबाळकर

Lok Sabha Election : पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्याने दोन फॉर्म भरण्यात आले; राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटरचं स्पष्ट वक्तव्य

Latest Marathi News Live Update: नाशिकात ५ तर दिंडोरीत ६ उमेदवारी अर्ज बाद

SCROLL FOR NEXT