new 1271 corona patients today in Nagpur
new 1271 corona patients today in Nagpur  
नागपूर

मिनी लॉकडाउन खरंच प्रभावी ठरतोय? कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा एक हजार पार; नियम पाळाच 

केवल जीवनतारे

नागपूर ः जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट होता, त्या सहा महिन्यांपुर्वी चाचण्यांचा आकडा अवघा सात ते आठ हजारावर होता. मात्र फेब्रूवारी, मार्चमध्ये चाचण्यांचा वेग अतिशय वाढवण्यात आला आहे. १ ते ७ मार्च या काळात ७३ हजार ८७५ चाचण्यांचा विक्रम प्रशासनाने नोंदवला आहे. तर तब्बल ७ हजार ९४१ कोरोनाबाधित आढळून आले. रविवारी (ता.७) रोजी १ हजार २७१ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले. तर ७ जणांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यातील वाढता प्रकोप व कोरोना संसर्गाचा दर कमी करण्यावर प्रशासनाचा अधीक भर आहे. कोरोना संसर्गाचा दर १०.७५ टक्के आहे. विशेष असे की, कोरोना वाढत आहे त्याच तुलनेत मृत्यूचा टक्का देखील वाढतआहे. १ ते ७ मार्च या सात दिवसांत ५५ कोरोनाबाधितांचा झाला. 

रविवारी शहरात ७ हजार ००८ व ग्रामीण भागामध्ये २ हजार ३४४ अशा ९ हजार ३५२ चाचण्या करण्यात आल्यात. यापैकी ग्रामीणमधून २३१, शहरातुन १०३७ तर जिल्ह्याबाहेरील ३ असे १२७१ नवे कोरोनाबाधित आढळून आलेत. यामुळे आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ५७ हजार ७२९ वर पोहचली आहे. 

तर आज दिवसभरात ग्रामीणमधील १, शहर व नागपूर जिल्ह्याबाहेरील प्रत्येकी तीन अशा ७ जणांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे एकूण कोरोनाबळींची संख्या ४ हजार ३९० वर पोहचली आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यात १० हजार ८५० सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील २ हजार ९०९ जणांना सौम्य, मध्यम व तीव्र अशी लक्षणे असल्याने ते शासकीय, खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर ७ हजार ९४१ जण गृह विलगीकरणात आहेत.

१० दिवसानंतर ११६० कोरोनामुक्त

गेल्या दहा दिवसानंतर प्रथमच आज एक हजाराहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी दिवसभरात १हजार १६० जणांनी कोरोनावर मात केली. मागील सात दिवसांत ५ हजारह ३०७ जण ठणठणीत होऊन घरीही परतले. तर आतापर्यंत कोरोनामुक्तांची संख्या १ लाख ४२ हजार ४८९ वर पोहचली आहे. ९०.३४ टक्क्यांवर कोरोनामुक्तांचा दर पोहचला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

SCROLL FOR NEXT