corona  PASIEKA
नागपूर

कधी संपणार कोरोनाचं मृत्यूचक्र? नागपूर जिल्ह्यात आज तब्बल ७५ रुग्णांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : गेल्या महिन्यापासून राक्षसी वेगाने वाढत असलेल्या कोरोना विषाणूचा विळखा घट्ट होत असून शुक्रवारी एकाच दिवशी ७५ जण कोरोनाबळी ठरले. तर दिवसभरात नव्याने ६ हजार १९४ बाधितांची भर पडली. त्यामुळे आतापर्यंतच्या मृत्यूचा आकडा ६ हजार १०९ वर पोहचला आहे. तर बाधितांची संख्या ३ लाख ९ हजार ४३ झाली आहे. हे सारे दृष्य बघत असणाऱ्या प्रशासनाकडून मात्र सामान्य जनतेला समाधान मिळेल असे काहीच होताना दिसत नाही.

बाधित वाढत असल्याने रुग्ण खाटांसाठी जीव मुठीत घेऊन या रुग्णालयातून त्या रुग्णालयात चकरा मारत आहेत, वाटेतच कोरोनाने जीव जात आहेत, ही जीव हानी थांबवण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. शुक्रवारी २५ हजार ५७३ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यापैकी केवळ १३ हजार २९७ या आरटीपीसीआर चाचण्या झाल्या आहेत.

उर्वरित सर्व चाचण्या रॅपिड ॲन्टिजेन झाल्या आहेत. नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण भागातील कोरोनाची परिस्थिती आता नियत्रंणाबाहेर गेली आहे. गंभीर संवर्गातील रुग्णांना खाटा मिळत नसल्याने मृत्यूचा टक्का वाढत आहेत. दिवसभरात शहरात३७ तर ग्रामीणमध्ये ३१ जण कोरोनाने दगावले आहेत. तर जिल्ह्याबाहेरील ७ जणांचा समावेश आहे.

दिवसभरात तब्बल ५ हजार ८९४ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांची एकूण संख्या २ लाख ३८ हजार ५९९ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७.६० टक्क्यांवर आले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी खालावली; सातारा-सांगलीसह संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली, 'महाजनकोची' वीजनिर्मिती बंद पडल्यास काय होणार?

Latest Marathi News Live Update : नागपूर ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश

Chanakya Life Guide : लोक अचानकपणे तुम्हाला इज्जत देणं का बंद करतात? तुमचं कुठं चुकतं पाहा

IPL 2026 Qualifier 2: गुजरात टायटन्स - राजस्थान रॉयल्स, सामना रद्द झाल्यास काय? RCBविरुद्ध फायनलमध्ये कोण खेळणार?

SCROLL FOR NEXT