Radhakrushnan 
नागपूर

नागपूर महापालिकेचे नवे आयुक्त राधाकृष्णन फोनवरून स्वीकारणार पदभार

राजेश चरपे

नागपूर : नागपूर महापालिकेचे नवे आयुक्त राधाकृष्णन बी. उद्या गुरुवारी (ता.२७) नागपुरात दाखल होणार आहेत. कोरोना पॉझिटिव्ह असल्याने मुंढे यांच्याकडून फोनवरूनच ते शुक्रवारी महापालिकेचा पदभार स्वीकारतील.

राधाकृष्णन २००८ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. जालना जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून त्यांची प्रशासकीय सेवेला सुरुवात झाली. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी, नाशिकचे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे अध्यक्ष, मुंबई म्हाडाचे मुख्याधिकारी म्हणून त्यांनी यापूर्वी काम केले आहे. अतिशय मितभाषी आणि प्रसिद्धी पराङ्मुख अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. विदर्भात त्यांनी आजवर काम केले नाही. नागपूर महापालिकेच्या माध्यमातून ते प्रथमच विदर्भात येत आहेत.

महापालिकेचे आयुक्त म्हणूनही त्यांची ही पहिलीच नियुक्ती आहे. मध्यंतर सनदी अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्यांमुळे सुमारे एक महिन्यापासून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते.

तुकाराम मुंढे यांनी सात महिन्याच्या कार्यकाळात शहरात चांगलाच दबदबा निर्माण केला होता. महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त लावली. कुठलेच घोटाळे, गैरव्यवहार खपवून घेतले नाहीत. जनतेमध्येही मुंढे अल्पावधीतच लोकप्रिय झाले होते. त्यामुळे नव्या आयुक्तांकडूनही अपेक्षा वाढल्या आहेत.

काम करण्याची चांगली संधी
नागपूर माझ्यासाठी नवे शहर आहे. येथे काम करण्याची चांगली संधी आहे. आजच नियुक्तीचे आदेश मिळाले असून गुरुवारी येतो आहे. मावळते आयुक्त तुकाराम मुंढे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने ते गृह विलगीकरणात आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष न भेटता त्यांच्याशी बोलून महापालिकेचा पदभार स्वीकारेन.
राधाकृष्णन बी
पालिकेचे नवे आयुक्त

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणेकरांनो लक्ष द्या! संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत मोठे बदल; कोणते मार्ग बंद राहणार?

Thane News: भाईंदर-ठाणे प्रवास होणार वेगवान! कॉरिडॉर प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी; ट्रॅफिक जामला ब्रेक मिळणार, कसा असेल मार्ग?

Ketan Agrawal Murder Case: सिया गोयलच्या वकीलपत्रासाठी दोन वकिलांमध्ये पेटला वाद! अ‍ॅड. विपूल दुशिंग यांचं म्हणणं काय?

Latest Marathi News Live Update: पालखी मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याबाबत आदेश

Marriage Numerology : 'या' मुलांकाच्या लोकांना बायकोच्या रूपात मिळते लक्ष्मी; पतीच्या यशामागे असतो फक्त तिचाच हात

SCROLL FOR NEXT