Sakal News 
नागपूर

एआयसीटीईकडून इंजिनिअरिंग प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक

मंगेश गाेमासे

नागपूर : अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.वेळापत्रकानुसार सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग १ सप्टेंबरपासून, तर नव्याने प्रवेशीत होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ग १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. तसेच या वेळापत्रकानुसार राज्यांना पहिली गुणवत्ता यादी २० ऑक्टोबरपूर्वी जाहीर करावी लागणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे शाळा, कॉलेजे बंद आहेत. यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास उशीर होत आहे. अभियांत्रिकी प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर आवश्यक असलेली ‘जेईई‘ सप्टेंबरमध्ये होणार आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिका खारीज करण्यात आलेली आहे. आता परिषदेने दिलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार २० ऑक्टोबरपूर्वी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणे अपेक्षित आहे. त्यामुळे राज्यांनाही आता त्यांच्या प्रवेश परीक्षा सप्टेंबर महिन्यातच पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे.

दुसरी गुणवत्ता यादी १ नोव्हेंबरपर्यंत जाहीर करावी लागणार आहे. तर इंजिनिअरिंगचे वर्ग हे १ नोव्हेंबरपासून सुरू करावेत असेही परिषदेने सूचित केले आहे. यामुळे राज्य सरकारने १ नोव्हेंबरपर्यंत व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश पूर्ण करावे लागणार आहे.

सरकारकडून निर्णय अपेक्षित

आता राज्य सरकार इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षेबाबत लवकर निर्णय घेणे अपेक्षित आहे. यावरच पुढील प्रक्रिया अवलंबून असणार आहे. यापूर्वीच अंतिम वर्षाच्या परीक्षांवर निर्णय झाला नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

नवीन वेळापत्रक
१ सप्टेंबर - नव्या शैक्षणिक वर्षास सुरुवात
२० ऑक्टोबरपर्यंत - पहिली प्रवेश फेरी
१ नोव्हेंबरपर्यंत - दुसरी प्रवेश फेरी
१ नोव्हेंबर - नव्याने प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात

संपादन- अनिल यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT