file 
नागपूर

नातेवाइकांचे रुसवेफुगवे टाळण्यासाठी लढविली नव्या पिढीची ‘ही’ नवी शक्कल...

दिलीप गजभिये

खापरखेडा (जि.नागपूर): कोरोनाकाळापूर्वी सामूहिक कार्यक्रमांचे आयोजन करणे म्हणजे अग्निदिव्य पार पाडण्यासारखेच होते. साध्या घरगुती कार्यक्रमाचेच बघाना. अहो, कार्यक्रमाच्या आयोजनापासून कार्यक्रमाला कोण कोण येणार इथपर्यंत यादी तयार करण्यापर्यंत, कोणाचे रूसवेफुगवे काढण्यापासून सगळे सोपस्कर पाडण्यापर्यंत सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरच जणू ! आता मात्र कोरोनाने उद्रेक घातला आणि सगळे रीतीरिवाज, परंपरांवर अंकूश लागला. काही शिक्षित युवकांनी मात्र नवी शक्कल लढवून जुन्या परंपरांना छेद दिला आहे.

सोशल मीडियाचा वापर करून ऑनलाईन सोहळा
लॉकडाउनमुळे सामूहिक सोहळ्यांना कोरोनाकाळात ‘ब्रेक’ लागला तरी अनेक जण शक्कल लढवून लग्नाचा मुहूर्त साधताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्या मुलाचा विवाहसोहळा लॉकडाउनमुळे धुमधडाक्यात न होता फेसबुकवरून हा विवाहसोहळा पार पडला. अशाच प्रकारचा साक्षगंधाचा कार्यक्रम सावनेर तालुक्यातील भानेगाव येथे कुंदन साद या वरपक्षाच्या घरीच वर आणि वधुपक्षांसह, १५ लोकांच्या उपस्थितीत पार पडला. कोरोनामुळे समारंभाच्या कार्यक्रमाला २० ते ५० पेक्षा अधिक व्यक्ती नको, असा नियम असल्याने इतर सर्व जवळचे नातेवाइक, मित्रमंडळी समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित असावे, म्हणून या शिक्षित वर आणि वधू जोडप्याने नवीन शक्कल लढवत सोशल मीडियाचा वापर करून ऑनलाईन सोहळा पार पाडला.

आशीर्वादासाठी गुगल मीट व फेसबुकचा वापर
साक्षगंधाच्या पत्रिकेवर समारंभाच्या कार्यक्रमाची ऑनलाईन उपस्थित होण्यासाठी फेसबुक आणि गूगल मीटसारख्या ॲपची माहिती आणि लिंकही छापून व्हाट्सअपवर पत्रिका इष्टमित्र आणि नातेवाईकांना दिली होती. आप्तेष्ट आणि मित्र मंडळीने फेसबुक आणि गूगल मिटवरून होणाऱ्या नवदाम्पत्यांना साक्षगंधानिमित्त आशीर्वाद दिले. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी बहुतांश कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असून आता विवाह सोहळ्यासह उर्वरित मोठे सोहळेही स्थगित करण्यात आले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लग्नाचा बडेजाव कमी झाला आहे. मोजक्या लोकांमध्ये समारंभ सोहळे पार पाडणे म्हणजे सर्व जवळच्या आप्तस्वकियांना निमंत्रण न मिळाल्याने राग आणि रुसवेफुगवेचा सामना करणे टाळण्यासाठी ॲपच्या मदतीने ऑनलाईन सोहळे करण्याचा नवा फंडा या जोडप्यांनी सर्वांसाठी समोर आणला.

अधिक वाचाः बंगालच्या उपसागरात १९ ऑगस्टदरम्यान आणखीन एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे.

या पद्धतीने लागला खर्चावर अंकूश
कमी खर्चाचा समारंभ या पद्धतीने ऑनलाईन कार्यक्रम होत असल्यामुळे अनेक कार्यक्रमाचा अमाप होणार असलेला खर्च आटोक्यात आला. मुलाने मुलीला पाहायचा कार्यक्रम असो वा मुलीकडून घर बघायचा कार्यक्रम किंवा लग्न, वाढदिवस असे समारंभ यासारख्या मोठ्या कार्यक्रमात उपस्थित होणार असलेल्या लोकांच्या उपस्थितीवरही अंकूश लागला. यामुळे घरीच बसून अथवा ऑफिस मध्ये असो वा बाहेर स्वतःचे काम करीत असताना ऑनलाईन होणाऱ्या या समारंभाच्या कार्यक्रमात उपस्थिती होता येते. यामुळे वाया जाणारा वेळही वाचला आहे. कांदेपोहे, अहेर, बँड बाजा, घोडा गाडी यासारख्या अनेक खर्चांवर अंकूश लागला.

संपादन  : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT