New Policy Of Tourism Development Very Soon 
नागपूर

पर्यटनक्षेत्राला बूस्ट, प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र करणार या उपाययोजना... 

राजेश रामपूरकर

नागपूर ः झपाट्याने विकसित होणारा उद्योग म्हणून पाहिले जात असलेल्या पर्यटन क्षेत्राला कोरोना विषाणूचा विखळा बसल्याने हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. या विषाणूच्या प्रसारावर प्रतिबंधात्मक उपाय आणि धोरण ठरविण्यासाठी केंद्र सरकार पुढे सरसावले आहे. पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाकडून देशभरातील हॉटेल्स, रिसोर्ट, बेड ऍण्ड ब्रेकफास्ट, होम स्टे, अपार्टमेंट हॉटेल, टाईम शेअरिंग युनिट आणि गेस्ट हाऊसची माहिती संकलित करण्यास प्रारंभ केला आहे. त्याचा उपयोग पर्यटन विकासाचे धोरण व योजना तयार करण्यात येणार आहे. 

पर्यटन निवास पर्यटन उद्योगातील महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाकडूनच केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशभरातील हॉटेल, रिसोर्ट आदी युनिटची माहिती प्रणाली तयार करण्यात येणार आहे. याच आधारे नवीन धोरण निश्‍चित करण्याचा विचार सरकार करीत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्योग डबघाईस आलेला असताना या साथ रोगाचा प्रसार होणार नाही. तसेच प्रतिबंधात्मत उपाय ठरविण्यासाठी या माहिती प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. 

पदाधिकारी, सदस्यांनी फिरवली बैठकीकडे पाठ, हे आहे कारण... 
या सर्वच युनिटची नोंदणी करण्यासाठी www.hotelcloud.nic.in या संकेतस्थळावर हॉटेल, रिसोर्टचे नाव, संपूर्ण पत्ता, खोल्या संख्या, ईमेल आयडी, प्राधिकृत कर्मचाऱ्यांचे नाव आणि त्यांचा मोबाईल क्रमांक आदी माहिती भरायची आहे. ही माहिती शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्याने निश्‍चितच हॉटेल व रिसोर्टचा व्यवसाय वाढण्यास मदत होणार आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील हॉटेल, रिसोर्ट, बेड ऍण्ड ब्रेकफास्ट, होम स्टे आणि गेस्ट हाऊसधारकांनी या संकेतस्थळावर new click here... या ठिकाणी क्‍लिक करून माहितीची नोंदणी करायची आहे. 

नोंदणी करणे गरजेचे 
पर्यटन व्यवसाय वाढविण्यासाठी पर्यटन संचालनालयाने पुढाकार घेतला आहे. शासनाच्या सूचनेनुसार हॉटेल, रिसोर्ट, बेड ऍण्ड ब्रेकफास्ट, होम स्टे, अपार्टमेंट हॉटेल, टाईम शेअरिंग युनिट आणि गेस्ट हाऊसधारकांनी नोंदणी करणे गरजेचे आहे. 
हनुमंत हेडे, उपसंचालक (पर्यटन), प्रादेशिक कार्यालय अमरावती 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! महाराष्ट्रासह 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 85 किमी वेगाने वाहणार वारे; माॅन्सून परतण्यापूर्वी वाढणार चिंता

IND VS AFG 3RD T20I: २० चेंडूंत १०२ धावा... Abhishek Sharma ने ट्वेंटी-२०चा इतिहास-भूगोल बदलला! एक नव्हे अनेक विक्रम मोडले, सेलिब्रेशन तर भारीच केले Video Viral

Tarapur Leopard Scare: तारापूर-चिंचणी परिसरात बिबट्याला गुरांचा चोप; नागरिकांमध्ये भीती, वनविभागाकडे जेरबंदाची मागणी

Latest Marathi News Update : वाशिम-कारंजा मार्गावर CNG गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील सिलेंडरचा स्फोट; जीवितहानी टळली

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

SCROLL FOR NEXT