corona  
नागपूर

महत्वाची बातमी! उपराजधानीत कोरोनाचा नवीन स्ट्रेन नाही; पालकमंत्री नितीन राऊत यांची माहिती 

निलेश डोये

नागपूर : जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचे रुग्ण नसून परिस्थिती आटोक्यात आहे. सध्या लागू असलेले निर्बंध ७ मार्चपर्यंत कायम असून त्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय, प्रतिष्ठान दोन दिवस बंद राहतील, असे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.

कोरोनाबाबत पालकमंत्री राऊत यांनी विभागीय आयुक्त कार्यालय येथे आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, जिल्‍ह्यातील स्थिती नियंत्रणात आहे. कोरोनाबाबत नियमावलीचे पालन करणे आवश्यक असल्याचे विशेषज्ज्ञांकडून सांगण्यात येत आले. त्यामुळे शनिवार व रविवार या दोन दिवशी सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने दुकाने, मॉल व गर्दीचे ठिकाण बंद ठेवावी. गरज नसेल तर कोणीही घराबाहेर पडू नये. 

मास्क न घालणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी, चाचण्यांची संख्या सध्या तीनपट आहे. सुपर स्प्रेडर घटकांमध्ये हॉकर्सची तपासणी करण्यात येणार आहे. रात्री उशिरा हॉटेल्स खानावळी सुरू राहणार नाही याबाबत धोरण आखावे, मेयो, मेडिकल याठिकाणी यापूर्वीच्या सर्व व्यवस्था बहाल करण्यात याव्या. 

हॉस्पिटलमधील मनुष्यबळ गरजेनुसार वाढवावे. लक्ष्मीनगर,धरमपेठ, हनुमाननगर, या भागातील वाढीव रूग्ण संख्येवर तातडीने नियंत्रण मिळवावे, असे आवाहन ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री राऊत यांनी केले. यावेळी विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे उपस्थित होते.

विरोधक त्यांचे काम करताहेत

वन मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत आहे, या प्रश्नावर राऊत म्हणाले की, विरोधक त्यांचे काम करीत आहे. निंदकाचे घर असावे शेजारी, या म्हणीप्रमाणे त्याची गरज असल्याचा टोला त्यांनी लगावला. पोहरादेवी येथील गर्दीबाबतच्या प्रश्नाला मात्र त्यांनी बगल दिली. 

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT