New Year 2023 Vigilance of police on New Year celebrations 25 fixed point 2500 police deployed nagpur esakal
नागपूर

New Year 2023 : नववर्ष जल्लोषावर पोलिसांचा जागता पहारा

कारवाईसाठी २५ फिक्स पॉइन्ट अडीच हजार पोलिस तैनात

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नववर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी शहरात एकीकडे ठिकठिकाणी पार्टी आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. तेव्हा दारू पिऊन हुल्लडबाजी करणाऱ्या मद्यपींवर कारवाईसाठी उद्या शनिवारी (ता.३१) सायंकाळपासूनच संपूर्ण शहरात अडीच हजार पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आले.

यासाठी उपराजधानीतील २५ फिक्स पॉइन्ट निश्चित करण्यात आले असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. कुटुंबासह जाणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही आयुक्तांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या.

फुटाळा, धरमपेठसह तरुणाई जमा होणाऱ्या ठिकाणीही पोलिसांची विशेष गस्त राहील. महिला व मुलींची छेड काढणाऱ्यांना थेट कोठडीत डांबण्याचे आदेश आयुक्तांनी पोलिस निरीक्षकांना दिले आहे.

थर्टी फर्स्टला उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्यात यावी अथवा नाही हे परिस्थितीनुसार ठरविण्याचे अधिकार संबंधित पोलिस उपायुक्तांना देण्यात आले आहेत. रात्री १२ वाजतानंतर ध्वनीक्षेपक वाजविणाऱ्याविरुद्ध कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येतील,असा इशाराही अमितेशकुमार यांनी दिला.

जामिनावर कारागृहातून बाहेर आलेल्या २५० पेक्षा अधिक गुन्हेगारांवर पोलिसांचा ‘वॉच’ आहे. ड्रंकन ड्राइव्ह कारवाईसाठी ७५ मशिन्स आहेत. नागरिकांनी उत्साहात व शांततेत नववर्षाचे स्वागत करावे,असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले.

४० जणांना परवानगी

नववर्षांच्या स्वागतासाठी आयोजित पार्ट्यांसाठी आतापर्यंत ४० जणांना परवानगी देण्यात आली आहे. समाजमाध्यमांवरून विना परवानगी पार्टीची जाहिरात देणाऱ्या १६ प्रतिष्ठानांना परवानगी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पार्टी असलेली ठिकाणे, हॉटेल्स मालकांना महिलांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचेही त्यांना बजावण्यात आले आहे. पार्टीच्या ठिकाणी साध्या गणवेशात महिला पोलिस तैनात करण्यात येणार आहेत.

स्वत-सह इतरांची काळजी घ्या

नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. नववर्षाच्या स्वागतादरम्यान आपल्यामुळे कुणाचाही जीव धोक्यात येणार नाही याची काळजी वाहन चालविताना घ्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Labour Law: कर्मचाऱ्यांची लॉटरी! उरलेल्या सुट्ट्यांवर मिळणार थेट कॅश; एकही Leave वाया जाणार नाही, काय आहेत नवे नियम?

Bidkin Bribe Case : बिडकीन ग्रामीण रुग्णालयात लाच प्रकरण उघड; वैद्यकीय अधीक्षकासह दोघे जाळ्यात, परिसरात खळबळ

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Loha News : संतोष म्हणतो आणि फिरून जन्मेन मी..! भारसावडेकरांनी घेतला पुढाकार

KKR vs PBKS Live: इडन गार्डनवर मुसळधार पाऊस... ५-५ षटकांची होणार मॅच, जाणून घ्या cut-off time, लाईव्ह अपडेट्स

SCROLL FOR NEXT