Nagpur Traffic Sakal
नागपूर

Nagpur Traffic : शहरातील नऊ मार्गांवरील वाहतूक वळविली

सर्व रस्त्यांच्या कामाच्या ठिकाणी सूचना फलक व काम सुरू केल्याची, काम पूर्ण करण्याची दिनांक नमूद करावे.

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : शहरात सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या कामामुळे तब्बल नऊ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. ३१ ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण होणार असल्याने सुमारे पाच महिने हे रस्ते बंद राहतील.

मनीषनगर रेल्वे क्रॉसिंग ते पावनभूमी मुख्य रस्ता व महादेव मंदिर रस्ता, हंम्पयार्ड रोड ते जनता चौक आणि आनंद टॉकीज ते धंतोली पोलिस स्टेशन (पुलापर्यंत), देवनगर चौक ते स्वामी विवेकानंद चौक ते गजानननगर,

भारत पेट्रोल पंप (जॉगर्स पार्क- सावरकर गार्डन) फुटबॉल गाऊंडपर्यंत, जय दुर्गा ट्रॅवल्स ते आरबीआय कॉलोनी, जयप्रकाशनगर, न्यू स्नेहनगर खामला रोड ते मालवीयनगर, नीरी रोड ते आठ रस्ता चौक वाहतूक बंद करण्याचे आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले.

कार्यस्थळी काय असावे

  • या सर्व रस्त्यांच्या कामाच्या ठिकाणी सूचना फलक व काम सुरू केल्याची, काम पूर्ण करण्याची दिनांक नमूद करावे.

  • कंत्राटदाराने स्वतःचा पत्ता व संपर्कासाठी मोबाईल क्रमांक असलेला बोर्ड लावावा.

  • पर्यायी मार्ग सुरू होतो, त्याठिकाणी दोन्ही टोकांवर तसेच बॅरिकेट्स जवळ रोडवर वाहतूक सुरक्षारक्षक, स्वयंसेवक नेमावे.

  • मलबा वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असा रस्त्यावर टाकू नये. त्याकरिता विशेष व्यवस्था करावी. रस्त्यावर झालेले खड्डे तात्काळ बुजवून त्यावर सिमेंटीकरण, डांबरीकरण करावे, असे नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT