Nilesh Rane and Sharad Pawar sakal
नागपूर

Nagpur News : नीलेश राणेंच्या कानाखाली वाजवा अन् एक लाख रुपये मिळवा; राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नेत्याने दिली ऑफर

निवडणूक जवळ आल्यावर शरद पवार यांना मुस्लीम समाजाचा पुळका येतो. जणू काही औरंगजेबाचा पुनर्जन्म झाल्यासाखरे वाटते अशा आशयाचे वादग्रस्त ट्वीट नीलेश राणे यांनी केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - वारंवार शरद पवार यांच्याविषयी अपशब्दात बोलणारे आणि त्यांची औरंगजेबाशी तुलना करणारे माजी खासदार नीलेश राणे यांच्या कानाखील वाजवा आणि एक लाख रुपये मिळवा अशी ऑफर नागपूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबा गुजर यांनी दिली आहे.

निवडणूक जवळ आल्यावर शरद पवार यांना मुस्लीम समाजाचा पुळका येतो. जणू काही औरंगजेबाचा पुनर्जन्म झाल्यासाखरे वाटते अशा आशयाचे वादग्रस्त ट्वीट नीलेश राणे यांनी केले आहे. या ट्विटमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलाच भडका उडाला आहे. याचा निषेधही नोंदवण्यात आला आहे.

वायफळ बडबड करणाऱ्या नीलेश राणे यांच्या आता कानाखाली वाजवण्याची वेळ आली असल्याचे सांगून बाबा गुजर यांनी याकरिता एका लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये जातीय दंगली उफाळून आल्या आहेत. राज्यात शांतता व सलोखा कसा कायम राहील ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असते. मात्र राणे यात तेल ओतण्याचे काम करीत असल्याचा आरोप गुजर यांनी केला आहे. आमच्या वरिष्ठ नेत्याचा अपमान सहन केला जाणार नाही याची दखल राणे कुटुंबीयांनी घ्यावी असा इशाराही बाबा गुजर यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT