नागपूर

वयाच्या अठराव्या वर्षी ‘प्राक्तन’ कादंबरी गाजली अन्...

सुधीर बुटे

काटोल (जि. नागपूर) : साहित्य क्षेत्रात नावलौकिक मिळविलेले व्यक्तिमत्त्व निरंजन माधव अंजनकर. विद्यार्थी दशेतच वयाच्या अठराव्या वर्षी ‘प्राक्तन’ कादंबरी लिहून साहित्यक्षेत्रात नाव कोरण्यात यश संपादित केले. त्यानंतर त्यांनी मागे पहिलेच नाही. सुमारे १५० कथा, शेकडो कादंबऱ्या व कवितांचा मोठा संग्रह एव साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे. वृत्तपत्र, दिवाळी विशेषांक यातून बरेचशे साहित्य प्रकाशित झाले आहे.

कोंढाळी येथील लाखोटीया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. निरंजन माधव प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा जन्म व बालपण अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजनाघाट येथे गेले. नववीमध्ये असताना पितृछत्र हरपले. आई व धाकटा भाऊ असा परिवार होता. दहावीत अमरावती येथे भाड्याच्या खोलीत राहून डीफार्मसी हा वैद्यकीय क्षेत्रातील डिप्लोमा घेतला. मूळ साहित्य क्षेत्राशी आवड असल्याने निर्णय बदलवून मराठी वाड्मय विषयात पदवुत्तर सुवर्णपदक प्राप्त केले. यातच आचार्य पदवी मिळविली. त्यांना त्यांच्या लेखणीने अनेक पुरस्कार मिळवून दिले.

डॉ. निरंजन माधव यांचे आजोबा नारायण आंडे हे तहसीलदार होते. त्यांना वाचनाची आवड असल्याने घरीच वाचनालय सुरू केले. आईवडील शिक्षक होते. त्यांना सुद्धा वाचनाची आवड. त्यामुळे शेंदूरजनाघाट येथे सुद्धा पुस्तके असल्याने बालपणीच वाचनाची आवड निर्माण झाली. वडील किशोर हे अंक व मासिके दर महिन्याला बोलवायचे. मामाकडे वाचनालय असल्याने येथे जाणे पर्वणीच असायची.

त्यांचे ‘प्राक्तन’ हे बंधन रेशमाचे, पारध, अभ्यर्थना, मृगजाळ आदी प्रसिद्ध संग्रह तसेच समीक्षण व्यंकटेश माडगूळकर कल्पविश्व, युगपुरुष (डॉ. आंबेडकर चरित्र) अभ्यर्थना रक्तरेषा (प्रसिद्ध कवितासंग्रह), आक्रीत, युगांतर (संग्रह), निसर्गनविता (समीक्षा), पर्यावरण, प्रहरी, मृण्मय चिन्मय काही नाटके व ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत.

डॉक्टर निरंजन माधव अंजनकर यांचा व माझा पस्तीस वर्षांपासून संबंध आहे. वयाच्या अठराव्या वर्षी लिहिलेली ‘प्राक्तन’ कादंबरी वाचताना मन हेलावून जाते. त्यांनी लिहिलेल्या कथा, कविता मनाचा ठाव घेतात.
- उद्धव ल. साबळे, नागपूर
निरंजन माधव हे आस्वादक समीक्षकसुध्दा आहेत. बऱ्याच ग्रंथांवर त्यांनी समीक्षालेखन केलेले आहे. एक उत्तम वक्ता आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. प्रबोधनपर कठीण विषय सहजसोपा करून अगदी हसत खेळत विद्यार्थी व श्रोत्यांच्या काळजात उतरविण्याची त्यांची हातोटी विलक्षणच म्हटले पाहिजे.
- अनंत भोयर, सुप्रसिद्ध कथाकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr. Madhav Gadgil: पर्यावरण चळवळीचा वैज्ञानिक आधार हरवला, डॉ. माधव गाडगीळ यांचं पुण्यात निधन!

Latest Maharashtra News Updates : नागपुरात ६५ हजार २८१ दुबार मतदार

Pune Traffic Alert : ट्रॅफिक अपडेट! पुणे शहराला जोडणारा महत्वाचा मार्ग ७ दिवस बंद राहणार

Pune News : रीलस्टार अथर्व सुदामे याला ‘पीएमपी’चा दणका; भरावा लागणार ५० हजारांचा दंड

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच महिलेने असं काही म्हटलं की… क्षणभर सगळे स्तब्ध झाले! पुढे काय घडलं?

SCROLL FOR NEXT