नागपूर

गडकरींच्या एका फोनवर नेपाळमधील मृत भारतीयाचा मृतदेह परत आणता आला, धम्म सहलीसाठी गेलेल्या व्यक्तीचं झालं होतं निधन

मेश्राम कुटुंबीयांच्या मदतीला नितीन गडकरी आले धावून ! नेपाळमध्ये मरण पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह भारतात आणण्यास केली मदत

सकाळ डिजिटल टीम

Nitin Gadkari : प्रभाग क्रमांक ३३ मधील कौसल्यायननगर येथील रहिवासी स्वप्नील देविदास मेश्राम यांचे लुंबिनी, नेपाळ येथे निधन झाले. मृतदेह सुपूर्द करताना अडचणी निर्माण झाल्याने ही बाब केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कळविण्यात आली. त्यांच्या प्रयत्नामुळे उद्या (ता. १९) शव शहरात दाखल होईल.

भदन्त गौतम, भदन्त तिस्स बोधी यांच्या नेतृत्वात स्वप्नील मेश्राम आणि ५० पर्यटक एका ट्रॅव्हल्सने १० डिसेंबर रोजी दीक्षाभूमी येथून बुद्धगयाकडे निघाले. बुध्दगया येथून १६ तारखेला शेवटचे स्थळ लुंबिनी येथे पोहचताच बसमध्येच स्वप्नील यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले पण डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. शवविच्छेदन केल्यानंतर जवळचे नातेवाईक सोबत नसल्याने मृतदेह सुपूर्त करण्यात अडचण आली. याबाबत नितीन गडकरींना कळविण्यात आले.

१८ डिसेंबर रोजी दिवसभर भारत-नेपाळ राजदूत कार्यालयात कायदेशीर प्रक्रिया करून रात्री ९ वाजता मृतदेह भदन्त गौतम आणि भदन्त तिस्स बोधी यांच्याकडे सुपूर्द केला. उद्या (ता. १९) लुंबिनी ते नागपूर ९८८ किमीचा प्रवास पूर्ण करून रात्री उशिरापर्यंत ते नागपुरात पोहोचतील. मंगळवारी रात्री मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार होणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT