Nitin Gadkari sakal
नागपूर

‘मी त्याला मागून लाथ मारली होती’; गडकरींचा व्हिडिओ व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : मी पालकमंत्री असताना कार्यालयासमोर मुलगा शुक्रवारी तलावात लघुशंका करीत होता. पोलिसांसहित माझा कॅनव्हा तेथून चालला होता. मी तो थांबवला, गाडीतून उतरलो आणि मुलाला मागून जोरदार लाथ मारली. तो मुलगा आडवा पडला. कारण, या शहराच्या स्वच्छतेशी माझी कटिबद्धता तेव्हाही होती, आजही आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. ‘मी त्याला लाथ मारली होती’ असे वक्तव्य असलेला गडकरींचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सोनेगाव तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमात गडकरी बोलत होते. एक घटना माझ्या आयुष्यात घडली. ती येथे सांगावी की सांगू नये, याचा विचार करीत आहे. परंतु, आता सांगूनच टाकतो, मला काही फरक पडत नाही, असे म्हणत त्यांनी मुलाला लाथ मारल्याची घटना सांगितली. स्वच्छतेप्रति आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. सोनेगाव तलावाचे काम करीत आहोत. परंतु, तलाव शुद्ध आणि स्वच्छ राहील, हे पाहणे सर्वांची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.

पुन्हा पैसे मागायला येऊ नका

तलाव शुद्ध व स्वच्छ राहिला पाहिजे. येथे सर्व पक्षी आले पाहिजे. पर्यावरणाचे संतुलन कायम राहिले पाहिजे. लोकांना आनंद मिळाला पाहिजे. नाही तर आम्ही चांगल्या वस्तू बांधत राहायचे आणि तुम्ही त्यावर कचरा टाकत राहायचा. आता हा धंदा चालणार नाही, असे गडकरींनी बजावले. तलावात कचरा टाकला आणि अनावश्‍यक झाडे पुन्हा उगवली तर सौदर्यीकरणासाठी पैसे मागायला येऊ नका, असेही त्यांना बजावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : पावसाची पुन्हा एन्ट्री! राज्यातील ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या भागात कसे असेल हवामान ?

Cutlet Paratha: एकदा बनवाल तर घरच्यांची फर्माईश ठरलेली! असा बनवा स्वादिष्ट कटलेट पराठा

आजचे राशिभविष्य - 29 सप्टेंबर 2026

US-China Trade Deal : अमेरिका-चीन ट्रेड वॉरला ब्रेक! ६० अब्ज डॉलरच्या व्यापारावर मोठा निर्णय, भारताची चिंता वाढली ?

अस्थिबोध : अवघड शस्त्रक्रिया; पण नियोजन अचूक!

SCROLL FOR NEXT