Nitin Gadkari  e sakal
नागपूर

मेडिकलची अवस्था बदलेल यावर विश्वास नाही - नितीन गडकरी

उपराजधानीत गोवारी हत्याकांड घडले. १९९४ सालचा प्रसंग. अधिष्ठातापदावर डॉ. एन. के. देशमुख होते

केवल जीवनतारे @kewalsakal

नागपूर : सरकार कोणत्याही पक्षाचे असो, मेडिकल-सुपरची स्थिती बदलेल यावर विश्वास बसत नाही. नवीन यंत्र आले की, काही दिवसात बंद. एक यंत्र आले की, दुसरे यंत्र बंद,दुसरे आले की, तिसरे बंद. थकबाकी दिली जात नाही, यामुळे सुधारण्यासाठी कंपनीचे इंजिनिअर येत नाही, अशी अवस्था झाली आहे. अशाही विपरीत स्थितीत विद्यार्थी केंद्रित शिक्षक आहेत, अशाच शिक्षकांची विश्वसनीयता कायम असते, तेच खरे आयुष्याचे संचित आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे व्यक्त केले.

निमित्त होते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (ता.१९) निवृत्त अधिष्ठाता डॉ. एन. के. देशमुख यांच्या आयुष्यावर विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या ‘एनकेडी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे. येथील मेडिकलच्या एपीआय सभागृहात आयोजित प्रकाशन सोहळ्यात केंद्रीय मंत्री गडकरी बोलत होते. अध्यक्षस्थानी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये बोलत होते. मंचावर राज्याचे मंत्री सुनील केदार, खासदार डॉ. विकास महात्मे, निवृत्त अधिष्ठाता डॉ. एन.के. देशमुख उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, सुपर स्पेशालिटीसाठी १८ वर्षे प्रयत्न केला, मात्र अजूनही स्थिती बदलली नाही. मात्र येथील शिक्षक विद्यार्थी केंद्रित होते. प्रामाणिक होते, पदावर असताना सत्कार होतो, परंतु निवृत्त झाल्यानंतरही डॉ. देशमुख यांचा गौरव होतो, यामुळे हेच आयुष्यातील भांडवल आहे. यावेळी डॉ. एन. के. देशमुख यांनी चांगला डॉक्टर घडवणे आणि गरिबांना योग्य उपचार मिळावे हीच भावना मेडिकलमध्ये काम करताना होती, असे मनोगतातून व्यक्त केले. राज्याचे पशुसंवर्धन तसेच क्रिडा मंत्री सुनील केदार म्हणाले, मेडिकलमध्ये अल्प संशोधन, इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव असताना कोरोना महामारीच्या काळात उत्कृष्ट सेवा दिली. अशाच सेवाभावातून डॉ. एन. के. देशमुख यांनी मेडिकलमध्ये रुग्णसेवेचा धर्म निभावला. संचालन डॉ. प्रमोद गिरी आणि डॉ. अनिल गोल्हर यांनी केले. डॉ. अरविंद कुऱ्हाडे, डॉ. प्रदीप कटकवार यांनी परिश्रम घेतले.

विद्वान लोकांचे राजकारण कठीण

क्षेत्र कोणतेही असो, चांगलं काम करणाऱ्यांना त्रास होते. त्यातही राजकारणात विद्वान असणे कठीण आहे. डॉक्टरांमध्ये तर ९९ टक्के विद्वान आहेत. अशावेळी सर्वात विद्वान कोण? असा पुन्हा प्रश्न उपस्थित केला जातो. वाईट काम केल्याने शत्रू निर्माण होत नाही, तर चांगले काम करणाऱ्यांचे जास्त शत्रू असतात, असे गडकरी म्हणाले.

तडिपार गुंडासोबत फोटो काढतो

अनेक ठिकाणी गुंड, तडिपार भेटतात. ते फोटो काढण्यासाठी विचारतात, फोटो काढून घ्या, असे सांगतो. गुंड, तडिपार यांना सुधारण्याचा प्रयत्न करतो. गुंड सुधारतात. समाजातील वाईट प्रवृत्तींची सुधारणा झाली की समाज चांगला होतो, असे परखड मतही यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी व्यक्त केले.

गोवारी हत्याकांडाची आठवण

उपराजधानीत गोवारी हत्याकांड घडले. १९९४ सालचा प्रसंग. अधिष्ठातापदावर डॉ. एन. के. देशमुख होते. प्रेतांचा खच पडला असताना डॉ. देशमुख यांनी अहोरात्र जागून शवविच्छेदनच नव्हे तर जे जख्मी गोवारी होते, त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले होत. त्यांच्या सेवाव्रताचा हा सत्कार आहे, अशी भावना यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी व्यक्त केली. त्यावेळी डॉ. देशमुख यांच्यासोबत डॉ. अरविंद कुऱ्हाडे यांचे हात गोवारींच्या सेवेत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : 'तो' तरुण सिंहगडावरुन बेपत्ता झालाच नाही, प्रकरणाला वेगळं वळणं ; नेमकं काय घडलं?

Sanju Samsonचे ट्वेंटी-२०त वेगवान शतक; आता Asia Cup मध्ये त्याला सलामीला खेळवायचं की नाही, हे निवड समितीनं ठरवायचं...

Latest Marathi News Updates : फडणवीस वाकड्यात घुसतात, म्हणून मी असं बोलतो – मनोज जरांगे

Adani Group: एका वर्षात अदानी समूहाचे कर्ज 20 टक्के वाढले; सरकारी बँकांनी किती कोटी दिले?

Khed Shivapur Toll : शिवापूर टोल नाक्यावर गणेशभक्तांना टोलमाफी; २४ तासांत सात हजार वाहनांना सवलत

SCROLL FOR NEXT