भंडारा : भंडारा-पवनी मार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले असून, नेरला-इटगाव-दवडीपार दरम्यान पाच किलोमीटर अंतराच्या या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ते काम अडवून ठेवले आहेत. त्यांना काळे झेंडे दाखवा, अशा शब्दात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज गुरुवारी (ता. ३) आंदोलकांना सुनावले. आज गडकरी यांच्या हस्ते भंडारा बायपासचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भंडारा-पवनी मार्गाच्या दुर्दशेसाठी गडकरींना काळे झेंडे दाखवले. त्या संदर्भात ते बोलत होते.
भंडारा-पवनी या मार्गाचे बांधकाम गेल्या तीन वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. काही ठिकाणी वनकायद्यामुळे काम रखडले आहे. मात्र, काही ठिकाणी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे रस्त्याला भेगा पडल्या असल्याचा आरोप आहे. या रस्त्यावर मोठे खड्डे आणि बांधकामासाठी खोदकाम झाल्यामुळे सतत अपघात होत आहेत. त्यामुळे भंडारा-पवनी मार्गावर लहानमोठ्या वाहन चालकांना व स्थानिक नागरिकांना त्रास होत आहे.
गडकरी आपल्या भाषणात म्हणाले की, भंडारा-पवनी मार्गाच्या बांधकामाला पर्यावरण मंत्रालयाने आधीच परवानगी दिली आहे. मात्र, स्थानिक वनाधिकारी यांनी मनमानी कारभार करून काम अडविले आहे. हे फॉरेस्टवाले निकम्मे आहेत, तुम्ही त्यांची नावे द्या, वनविभागाच्या विद्यमान सचिव यापूर्वी माझ्या विभागाच्या अतिरिक्त सचिव होत्या. त्यांना सांगून त्यांचा सीआर खराब करतो अन् त्यांच्यावर कठोर कारवाई करायला लावतो.
ते पुढे म्हणाले की, काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. पण ती चुकीच्या माणसासमोर केली. रस्त्याच्या दुर्दशेसाठी जबाबदार असलेल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर आंदोलन करा. म्हणजे जनतेला ते काम कोणामुळे अडले याची जाणीव होईल. काँग्रेसच्या लोकांना घेऊन वनकार्यालयात जाण्याची सूचना भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांना करून गडकरी पुढे म्हणाले की, तरीही ते काम करत नसतील, तर अशा लोकांच्या विरोधात कायदा हातात घेण्यात काही गैर नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.