Nitin Gadkari sakal
नागपूर

'तुम्ही फक्त येस सर म्हणायचं'; नितीन गडकरींनी अधिकाऱ्यांना सुनावलं!

गरीबांच्या कल्याणाच्या आड येणारा कायदा तोडण्याचा अधिकार आम्ही मंत्री असल्यानं आम्हाला आहे, असंही नितीन गडकरी म्हणाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

गरीबांच्या कल्याणाच्या आड येणारा कायदा तोडण्याचा अधिकार आम्ही मंत्री असल्यानं आम्हाला आहे, असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. गडचिरोली, मेळघाटात रस्ते बांधताना खूप त्रास झाला, वनविभागाचे अधिकारी रस्ते बांधूच देत नव्हते, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. नागपुरातल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सच्या नागपूर शाखेनं आदिवासींच्या आरोग्यासाठी ब्लॉसम हा प्रकल्प सुरू केलाय. त्याचं उद्घाटन काल नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, मी १९९५ मध्ये महाराष्ट्रात मंत्री होतो. त्यावेळी मी मुंबईत अनेक रस्ते, पूल बांधले. पण गडचिरोली मेळघाटमध्ये रस्ते बांधताना खूप अडचणी आल्या. कुपोषणामुळे इथं २००० मुलांचा मृत्यू झाला होता, ४५० गावांना रस्ते नव्हते. तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. खूप प्रयत्न केले, आय़ुक्तांना सांगितलं, पण वनविभागाचे अधिकारी रस्ते बांधूच देत नव्हते, त्यामुळे खूप त्रास झाला.

गडकरी पुढे म्हणाले की, वनविभागाने त्रास देऊनही मी माझ्या मार्गाने प्रश्न सोडवला. गरीबाचं कल्याण करण्यासाठी कुठलाही कायदा आडवा येत नाही. गरीबाच्या कल्याणासाठी आडवा येणारा कायदा एकदा नाही तर दहावेळा तोडावा लागला तरी तोडला पाहिजे, असं महात्मा गांधींनी सांगितलं आहे. पण तो कायदा तोडण्याचा अधिकार आमचा आहे, कारण आम्ही मंत्री आहोत.

नितीन गडकरींनी यावेळी अधिकाऱ्यांनाही सुनावलं आहे. नितीन गडकरी पुढे म्हणाले की, तुम्ही फक्त येस सर म्हणायचं, आम्ही म्हणतो त्याची अंमलबजावणी करायची हे लक्षात ठेवा, असं मी अधिकाऱ्यांना नेहमी सांगतो. आम्ही म्हणू तसं सरकार चालेल. त्यामुळे मी कायदे तोडून मेळघाटातली ४५० गावं जोडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पंजाब किंग्सचा सलग चौथा पराभव; दिल्ली कॅपिटल्सने Playoff चे गणित बिघडवले; CSK, KKR, RR ला संधी...

Big News: राहुल द्रविड बनला ट्वेंटी-२० संघाचा मालक; भारताशिवाय 'ज्या' देशाकडून खेळलेला, तिथेच युवा टॅलेंट शोधण्यासाठी परतला...

Operation Clean: अवैध मद्यनिर्मितीविरोधात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यभर ‘ऑपरेशन क्लीन’ सुरू; कायदा आणखी कडक

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

SCROLL FOR NEXT