nagpur nmc 
नागपूर

सुधरा लेकांनो, अशा संकटकाळातही तुम्हाला कशा आठवतात सुट्या?

सकाळवृत्तसेवा

नागपूर : संपूर्ण जगासह भारतावर देखील कोरोनाचे गंभीर संकट घोंगावत आहे. या कठीण काळात शासन-प्रशासन युद्धस्तरावर काम करत आहेत. अशात नागपूर मनपाच्या वैद्यकीय विभागातील काही कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सुट्या टाकल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे, सुटी मारताना त्यांनी वरिष्ठांना देखील विश्वासात घेतले नाही. आधीच सरकारी विभागातील कर्मचारी काम करत नसल्याची सर्वसामान्यांची बोंब असते. त्यात आता हा प्रकार समोर आल्याने भरपूर टीका होत आहे.

शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने भीतीचे वातावरण आहे. जिल्हा, महापालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पावले उचलत आहे. नागरिकांना सुविधा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांतही आता भीतीचे वातावरण आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाला बळकट करण्यासाठी आयुक्तांनी पाऊले उचलली आहे. मात्र, त्यांनी या काळात कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही सुट्यांची सवलत दिली आहे. याचाच काही वैद्यकीय अधिकारी फायदा घेत असल्याची बाब पुढे आली आहे. 

काही वैद्यकीय अधिकारी आणि संपूर्ण आरोग्य विभाग यावेळी नागपूरकरांना सेवा देत आहे. मात्र काही अधिकारी परस्पर सुट्यांचा अर्ज टाकून पळ काढत असल्याचे सुत्राने नमुद केले. काही अधिकारी सुट्यांवरून आल्यानंतर परस्पर रुजू होत असल्याने विभागप्रमुखांची कोंडी होत आहे. कोण, केव्हा येत, हे कळत नसल्याने कोरोनासारख्या रोगाविरुद्ध लढताना नियोजनाचा फज्जा उडत आहे. त्यामुळे विभागप्रमुखाने आता सुटीवर जाण्यापूर्वी कल्पना देऊन लेखी अर्ज मंजूर करण्याचे आदेश काढले. एवढेच नव्हे सुट्यांवरून परत आल्यानंतर परस्पर रुजू न होता विभागप्रमुखांना कळविण्याचे आदेशही देण्यात आले. त्यामुळे एकूणच महापालिकेचा आरोग्य विभाग कोरोना रोगापासून बचावासाठी संघर्ष करीत असताना काही वैद्यकीय अधिकाऱ्यांना मात्र गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT