NMC workers done cremation on corona patients 
नागपूर

अशी वेळ कोणावरही येऊ नये..कोरोनाबाधितावर अंत्यसंस्कार करणा-या कर्मचा-याची भावना

राजेश प्रायकर

नागपूर : कुणाचाही अंत्यसंस्कार ही दुःखद घटना आहे. त्यातही कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्काराचा अनुभव अत्यंत वेदनादायक होता. आता तरी कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्काराची वेळ येऊ नये असे नमुद करीत नागरिकांनी घरीच राहावे, असे भावनिक आवाहन सतरंजीपुऱ्यातील 'त्या' कोरोनाबाधितावर अंत्यसंस्कार करणाऱ्या मनपा  कर्मचाऱ्यांनी केले.

कोरोनाचा शहरातील पहिला बळी ठरलेल्या सतरंजीपुरा येथील 68 वर्षीय वृद्धावर नातेवाईकांऐवजी महापालिकेच्या चार कर्मचाऱ्यांनी अंतिम संस्कार केले. अर्थातच कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून पीपीई (पर्सनल प्रोटेक्‍शन इक्विपमेंट) किटचा वापर केला होता. कोरोनाबाधिताच्या जवळही जाण्याची जोखीम आज कुणीही पत्करण्याच्या तयारीत नाही. या चौघांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कर्तव्याला प्राधान्य दिले. आज महापालिकेचे हे चारही कर्मचारी ठणठणीत आहेत. नावे न छापण्याच्या अटीवर त्यांनी अंत्यसंस्काराच्या वेळी नेमके काय झाले, कुठली प्रक्रिया राबविण्यात आली, याचा अनुभव सांगितला. सर्वप्रथम अंगावर औषध फवारणी करण्यात आली. त्यानंतर पीपीई किट घालून मेयो येथील शवागृहातील त्या कोरोनाबाधिताचे पार्थिव बॉक्‍समधून बाहेर काढले. वेगवेगळ्या कापडांनी गुंडाळलेले पार्थिव स्ट्रेचरने शववाहक वाहनांपर्यंत आणले. त्यानंतर स्ट्रेचर मेयो प्रशासनाला परत केले अन्‌ जीव धोक्‍यात घालून लकडगंज येथील कब्रस्थानापर्यंत प्रवास सुरू झाला. कब्रस्थानीमध्ये जेसीबीने संपूर्ण खड्डा खोदल्यानंतर त्यात सोडिअम हायपोक्‍लोराईड औषधी शिंपडण्यात आले. पार्थिव खड्ड्यात ठेऊन त्यावर पुन्हा सोडिअम हायपोक्‍लोराईड शिंपडण्यात आले. खड्डा बुजविल्यानंतर पुन्हा एकदा औषधीची फवारणी करण्यात आली. संपूर्ण अंत्यसंस्काराने अंगावर औषधी फवारणी करण्यात आल्याचे या चौघांनी नमुद केले. आज हे चौघेही ठणठणीत असून महापालिकेला सेवा देत आहेत. परंतु अंत्यसंस्काराची वेळ अंगावर शहारे आणणारी होतीच, शिवाय नातेवाईकांऐवजी आमच्या हस्ते अंत्यसंस्कार करावे लागले, ही वेळ कुणावरही येऊ नये. यासाठी नागरिकांनी घरांमध्येच राहून स्वतःची सुरक्षा करावी, असे आवाहन या चौघांनी केले.

'ते' कपडे जाळले

7 फेब्रुवारीला घरून नेहमीचे कपडे घालून कामावर आलो. अंत्यसंस्कार करावे लागणार हेही माहित नव्हते. झोनल अधिकाऱ्यांचा फोन येताच अंत्यसंस्काराच्या प्रक्रियेला सुरुवात केली. सर्व प्रक्रिया पार केल्यानंतर पीपीई किट एका प्लास्टिकच्या थैलीत काढून ठेवली. त्यानंतर एका प्लास्टिकच्या थैलीत पीपीई किटची थैली टाकली. घरून घातलेले कपडे पूर्णपणे जाळण्यात आले अन्‌ गरम पाण्याने आंघोळ केल्याचेही त्यांनी नमुद केले.

संपूर्ण प्रक्रियेबाबत कुटुंब अनभिज्ञ

या प्रक्रियेत सहभागी कर्मचाऱ्यांबाबत महापालिकेने सुरक्षेच्या दृष्टीने गोपनीयता बाळगली. त्याचप्रकारे या कर्मचाऱ्यांनीही ही बाब अत्यंत गुप्त ठेवली. कुटुबीयांनाही या घटनेची माहिती देण्याचे टाळले. त्यामुळे आजही त्यांचे कुटुंबीय अनभिज्ञ आहे. थरार आणि शोक, असा वेगळाच अनुभव या घटनेनिमित्त मिळाल्याचे त्यांनी सांगितले. कर्तव्य करताना एखाद्यावर अंत्यसंस्काराची पूर्ण प्रक्रिया करावी लागण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही त्यांनी नमुद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT