corona test esakal
नागपूर

दिल्लीच्या रेल्वेगाड्यांनीही येऊ शकतो नागपुरात कोरोना!

रेल्वे स्थानकावर चाचणी नाही, प्रशासन बिनधास्त

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - दिल्लीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने विमानतळ आणि रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. मात्र, या निर्देशांकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. दिल्लीवरून येणाऱ्या रेल्वे गाड्यांमधून येणाऱ्या प्रवाशांची कोणत्याही प्रकारची चाचणी करण्यात येत नसल्याने शहरात कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

दिल्लीतून विमानांनी येणाऱ्या प्रवाशांमुळे कोरोना पसरू शकतो तर रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांमुळे नाही का? असा सवाल निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसापूर्वी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागपुरात वाढलेल्या रुग्णांमध्ये बहुतांशी दिल्लीची पार्श्वभूमी असल्याचे सांगितले होते. शहरात गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी रेल्वेने शहरात येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर, एन्टिजेन चाचणी करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात नागपूर मध्यवर्ती स्थानकावरून शहरात येणाऱ्या कोणत्याही प्रवाशांची कुठल्याही प्रकारे चाचणी करण्यात येत नाही. तसेच थर्मल स्क्रीनिंगचा सुद्धा उपयोग करण्यात येत नाही. नागपूर स्थानकावर सर्व प्रवासी बिनधास्त फिरत आहेत. यातील ९० टक्के लोकांच्या तोंडावर मास्क नाही. उर्वरित फक्त हनुवटीवर मास्क चढवून फिरत आहे. कोरोना वाढत असताना रेल्वे प्रशासन आणि प्रवासी बिनधास्त आहे.

रेल्वे प्रशासन सुस्त

बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्याची जबाबदारी जेवढी महानगरपालिकेची आहे त्याहून जास्त रेल्वे प्रशासनाचीही आहे. त्यामुळे दिल्लीसह ज्या भागात कोरोनाची पार्श्वभूमी आहे. त्या भागातील प्रवाशांवर लक्ष ठेवून त्यांची चाचणी तसेच किमान थर्मल स्क्रीनिंग तरी करायला हवी. मात्र, येथे कोणत्याच प्रवाशांची चाचणी करण्यात येत नसून प्रवासी बिनधास्तपणे स्थानकावर फिरत आहेत. प्रवाशांनी लसीकरणाचे डोस घेतले का याची साधी चौकशी सुद्धा केल्या जात नाही. दिल्लीहून आलेले प्रवासी थेट शहरात येत असल्याने कोरोनाची स्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्यात, असे मत प्रवाशांकडूनही व्यक्त होऊ लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT